पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय, बलात्काऱ्याला होणार नपुंसकत्वाची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 01:07 PM2020-11-25T13:07:22+5:302020-11-25T13:10:40+5:30

Pakistan Imran Khan And Rape : बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पाकिस्तान सरकार नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे.

law for chemical castration of rapists okayed by pm imran khan | पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय, बलात्काऱ्याला होणार नपुंसकत्वाची शिक्षा 

पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय, बलात्काऱ्याला होणार नपुंसकत्वाची शिक्षा 

Next

इस्लामाबाद - जगभरात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पाकिस्तान सरकार नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा या कायद्यात असणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत इम्रान खान यांनी या कायद्याला मंजुरी देण्यासाठी सहमती दर्शवल्याची माहिती मिळत आहे. 

पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा सादर करण्यात आला. बैठकीत या कायद्यावर चर्चा करण्यात आली. इम्रान खान यांनी या मसुद्याला मंजुरी दिली असल्याचं म्हटलं आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृतपणे यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा कायद्याची गरज असल्याचे नमूद केले होते.

इम्रान खान यांनी बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना घेऊन एक ग्रेडिंग सिस्टीम तयार करायला हवी. कठोर शिक्षा द्यायला हवी. जेणेकरून दोषी पुढील वेळी असे कृत्य करण्यासाठीच सक्षम राहणार नाही असं म्हटलं होतं. याआधी बांगलादेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी मंजुरी दिली आहे. 

मंत्रिमंडळाचे प्रवक्ता खांडकर अनवारुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला व बाल अत्याचार अधिनिमयाच्या संशोधनासंबंधित अध्यादेश जारी करू शकतात. कारण सध्या संसदेचं सत्र सुरू नाही. सध्याच्या कायद्यानुसार तेथे बलात्कार प्रकरणात अधिकतम शिक्षा जन्मठेप आहे. पीडितेचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूदंडाची परवानगी दिली जाते.

Web Title: law for chemical castration of rapists okayed by pm imran khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.