सेक्समधून बिझनेस साम्राज्य उभारणा-या ह्यूग हेफनर यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 12:36 PM2017-09-28T12:36:49+5:302017-09-28T12:38:47+5:30

ooअमेरिकेत अभ्याक्रमाची पदवी घेण्यासाठी चारवर्ष लागतात. हेफ यांनी अवघ्या अडीच वर्षात ही पदवी मिळवली.

Learn about Hugh Hefner's specialty building business empire from sex ... | सेक्समधून बिझनेस साम्राज्य उभारणा-या ह्यूग हेफनर यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी...

सेक्समधून बिझनेस साम्राज्य उभारणा-या ह्यूग हेफनर यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी...

Next
ठळक मुद्देह्यूग हेफनर यांना प्रेमाने जवळची माणसे हेफ म्हणायची. करीयरच्या सुरुवातीपासूनच  ते  हुशारी,  कुशाग्र बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. 

लॉस अँजिलोस- प्रसिद्ध अॅडल्ट मॅगझिन 'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन झालं आहे. 91 वर्षीय ह्यू हफनर यांनी बुधवारी रात्री अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला.

- ह्यूग हेफनर यांना प्रेमाने जवळची माणसे हेफ म्हणायची. करीयरच्या सुरुवातीपासूनच  ते  हुशारी,  कुशाग्र बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. 

- अमेरिकेत अभ्याक्रमाची पदवी घेण्यासाठी चारवर्ष लागतात. हेफ यांनी अवघ्या अडीच वर्षात ही पदवी मिळवली. उरबानातील इलिनॉईस विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी घेतली होती. 

- एमए पदवीसाठी शिक्षण घेत असताना त्यांनी 'अमेरिकन कायद्यात सेक्स वर्तन' या विषयावर निबंध लिहीला होता. त्या निबंधासाठी त्यांना ए ग्रेड मिळाला होता. 

- हेफ यांना त्यांची आई ग्रेसने प्लेबॉय मॅगझिन सुरु करण्यासाठी 1 हजार डॉलरचे कर्ज दिले होते

- नोव्हेंबर 1953 मध्ये प्लेबॉय मॅगझिनची सुरुवात झाली. पण पहिल्या आवृत्तीवर मॅगझिन कधी प्रसिद्ध झाले ती तारीख टाकण्यात आली नव्हती. कारण दुसरी आवृत्ती निघेल याची हेफनर यांना खात्री नव्हती. 

-  धर्मगुरु आणि चर्चमधल्या अधिका-यांनी प्लेबॉय मॅगझिन  विकत घ्यावे यासाठी हेफनर यांनी वेगळे सवलतीचे दर ठेवले होते. न्यूड फोटोसाठी प्लेबॉय मॅगझिनवर टीका करणा-यांनी या मुद्यावर जास्तीत जास्त डिबेट करावी हा सवलतीमागे उद्देश होता. 

- 1960 साली जेव्हा अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समान अधिकार नाकारण्यात आले त्यावेळी हेफनर यांनी शिकागोमध्ये पहिला प्लेबॉय क्लब सुरु केला. या क्लबमध्ये कुठलीही जाती-भेदाची भिंत नव्हती. सर्वांना प्रवेश होता. 

- ह्यूग हेफनर हे मॅगझिनच्या इतिहासात सर्वाधिकाळ संपादकपद भूषवलेले व्यक्ती आहेत. यावर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत ते सक्रीय होते. त्यांच्या मंजुरीनेच सर्व अकांचे प्रकाशन व्हायचे. 
 

Web Title: Learn about Hugh Hefner's specialty building business empire from sex ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.