चीनमध्ये नौका समुद्रात बुडून १२ जणांचा मृत्यू तर ४ जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 07:07 PM2021-04-04T19:07:13+5:302021-04-04T19:08:00+5:30
Ship sinks in China : जवळपास १२ जण बुडून मरण पावले तर अन्य चार जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी या अपघातात १६ जणांना वाचवण्यात आले आहे.
Next
ठळक मुद्देमदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर देखील पाठविण्यात आले होते आणि इतर मासेमारी नौका देखील मदतकार्यात व्यस्त आहेत.
बीजिंग - चीनच्या झेजियांग प्रांतात रविवारी एक मासेमारी करणारी नौका समुद्रात बुडाली, त्यात जवळपास १२ जण बुडून मरण पावले तर अन्य चार जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी या अपघातात १६ जणांना वाचवण्यात आले आहे.
शिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, चालक दलातील २० सदस्यांपैकी चार जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी शोध सुरू आहे. मरीन सर्च अँड रेस्क्यू सेंटरला आज पहाटे 4:28 वाजता बोट पलटी झाल्याची माहिती मिळाली. मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर देखील पाठविण्यात आले होते आणि इतर मासेमारी नौका देखील मदतकार्यात व्यस्त आहेत.