रुळ क्रॉसिंग करताना बसला रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 30 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 08:05 AM2020-02-29T08:05:57+5:302020-02-29T08:07:26+5:30
सुक्कुरचे एआयजी डॉ. जमील अहमद यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करण्याच्या प्रयत्नात बसची रेल्वेला धडक बसली. या भीषण अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार सुक्कुर जिल्ह्यातील रोहरी येथे ही दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस कराची येथून सरगोधा येथे जात असताना, रेल्वे रुळावरुन जाणाऱ्या पाकिस्तान एक्सप्रेसला टक्कर दिल्याने हा अपघात झाला.
30 people dead and several injured in a collision between a bus and Pakistan Express Train near Rohri in Sindh: Pakistan's Geo News
— ANI (@ANI) February 28, 2020
पाकिस्तानमधील वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुक्कुरचे आयुक्त शफीक अहमद महेसर यांनी दिली आहे. या अपघाताबद्दल सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, मदत व बचावकार्यसाठी आयुक्त महेसर यांना आदेशही दिले आहेत.
सुक्कुरचे एआयजी डॉ. जमील अहमद यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ही अतिशय भीषण दुर्घटना होती, रेल्वेला बसची जोराची धडक बसली आहे. या दुर्घटनेत बसच्या वरील भाग उडून पडला असून बसचे तीन तुकडे झाले आहेत. रेल्वेने साधारण 150 ते 200 फूट लांबपर्यंत बसला ओढत नेले होते, असेही अहमद यांनी सांगितले.