Uganda Bomb Blasts : युगांडा हादरला; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 02:39 PM2021-11-17T14:39:51+5:302021-11-17T14:40:18+5:30

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतर लोक शहर सोडताना दिसत आहेत.

at least two blasts in Uganda capital kampala police killed third attacker many injured | Uganda Bomb Blasts : युगांडा हादरला; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात

Uganda Bomb Blasts : युगांडा हादरला; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात

googlenewsNext

युगांडाची राजधानी कंपालामध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण स्फोटांत किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला सरकारविरोधी अतिरेक्यांचा समन्वित हल्ला म्हटले आहे. तसेच, या स्फोटांत तीन आत्मघाती हल्लेखोरही मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटामुळे कंपालामध्ये प्रचंट घबराटीचे वातावरण आहे. पोलीस प्रवक्ते फ्रेड एनान्गा म्हणाले, "बॉम्ब हल्ला, विशेषत: आत्मघातकी हल्लेखोरांकडून अजूनही हल्ल्याचा धोका काय आहे." (Suicide Bombings in Uganda)

अतिरेकी गटांच्या अथवा कट्टरतावाद्यांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या साइटनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित असलेल्या अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेसने स्फोटांची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही स्फोट केवळ तीन मिनिटांच्या आतच झाले आहेत. हे दोन्ही स्फोट स्फोटक घेऊन जाणाऱ्या हल्लेखोरांनी घडवून आणले. एनान्गा यांनी सांगितले, की तिसऱ्या लक्षावरील संभाव्य हल्ले पोलिसांनी अयशस्वी केले. यावेळी पोलिसांनी एका संशयित आत्मघातकी हल्लेखोराचा पाठलाग केला आणि त्याला ठार केले. मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

किमान 33 लोक जखमी -
एनान्गा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रेफरल हॉस्पिटलमध्ये किमान 33 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतर लोक शहर सोडताना दिसत आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना, यूएस दूतावासाने “कठोर शब्दांत” हल्ल्याचा निषेध केला आहे. एवढेच नाही, अमेरिकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "युगांडातील लोकांसाठी अमेरिकेचे समर्थन कायमच आहे. कारण आम्ही सुरक्षित, लोकशाही आणि समृद्ध युगांडाच्या आमच्या सामायिक ध्येयासाठी कार्यरत आहोत." यापूर्वीही, कंपालाच्या एका भागात 23 ऑक्टोबरला एका रेस्टॉरंटमध्ये  स्फोट झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर सात जण जखमी झाले होते.

Web Title: at least two blasts in Uganda capital kampala police killed third attacker many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.