२४० जणांना सोडा; इस्रायलने हमासला बजावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:41 AM2023-11-05T09:41:51+5:302023-11-05T09:42:07+5:30
इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला केला. व त्यानंतर तिथे रक्तरंजित संघर्ष झाला.
तेल अवीव : हमासने ओलिस ठेवलेल्या २४० जणांची तत्काळ मुक्तता करावी, अशी मागणी इस्रायलने केली. त्याशिवाय तात्पुरत्या युद्धविरामाचा विचार केला जाणार नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. गाझावरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्या देशाने ठामपणे सांगितले.
इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला केला. व त्यानंतर तिथे रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन यांनी तीनदा इस्रायलचा दौरा केला आहे. गाझामध्ये युद्धविराम घेण्याची गरज आहे या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेल्या भूमिकेचा ब्लिंकन यांनी पुनरुच्चार केला. इस्रायल व हमासच्या संघर्षात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी गाझामध्ये पुरेशी औषधे तसेच वैद्यकीय साधने नाहीत. (वृत्तसंस्था)
हिजबुल्लावर हल्ले
-इस्रायलने लेबनॉनला लागून असलेल्या सीमाभागात शनिवारी हवाई हल्ले केले. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैन्याच्या चौक्यांवर हल्लाला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.
-हिजबुल्लादेखील इस्रायलविरोधात लढत असल्याचे त्या संघटनेचा नेता सय्यद हसन नसरल्लाह याने शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानंतर हिजबुल्लाने रॉकेटचा मारा केल्याने इस्रायलच्या लष्करी चौक्यांचे नुकसान झाले होते.