बलुचिस्तानचा विषय सोडा अन्यथा आम्ही खलिस्तानचा मुद्दा जिवंत करु - पाकिस्तान
By admin | Published: October 8, 2016 11:17 AM2016-10-08T11:17:25+5:302016-10-08T11:25:23+5:30
नवाझ शरीफ सरकारने अमेरिकेत नियुक्त केलेल्या दोन विशेष राजदूतांनी भारता विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - काश्मिर मुद्यावर अन्य देशांना पाकिस्तानची भूमिका पटवून जास्तीत जास्त समर्थन मिळवण्यासाठी नवाझ शरीफ सरकारने अमेरिकेत नियुक्त केलेल्या दोन विशेष राजदूतांनी भारता विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने काश्मिरच्या विषयामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, चीन-पाकिस्तान-इराण सोबत जाण्याची धमकी देणा-या या पाकिस्तानी राजदूतांनी आता खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे.
भारताच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. मी त्यांना सांगू इच्छितो कि, त्यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा आम्ही खलिस्तान, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम या भारतातील राज्यांमधील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा उपस्थित करु. आम्हाला या विषयामध्ये जायचे नाही. कारण तो दुस-या देशाच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप ठरतो असे मुशाहिद हुसैन सय्यद यांनी सांगितले.
नवाझ शरीफ यांनी त्यांना काश्मिरप्रश्नी विशेष दूत म्हणून अमेरिकेत नियुक्त केले आहे. अफगाणिस्तानमध्ये शांततेचा मार्गही काश्मिरमधून जातो हे अमेरिकेने ध्यानात घ्यावे असा इशारा त्यांनी दिला.