लेबनॉनच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे राजीनामे; बैरुतमधील स्फोटांनंतर आठवड्याभरात सरकार पायउतार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 12:32 AM2020-08-11T00:32:40+5:302020-08-11T07:38:36+5:30

बैरुतमधील स्फोटांमुळे देशातील जनक्षोभ वाढल्यानं पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

Lebanon government resigns amid outrage over Beirut blast | लेबनॉनच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे राजीनामे; बैरुतमधील स्फोटांनंतर आठवड्याभरात सरकार पायउतार

लेबनॉनच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे राजीनामे; बैरुतमधील स्फोटांनंतर आठवड्याभरात सरकार पायउतार

Next

बैरुत: लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांच्यासह त्यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये स्फोट झाले होते. त्यामुळे सरकारविरोधात असलेला जनक्षोभ वाढला. हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारबद्दलचा संताप व्यक्त केला. त्यानंतर आता पंतप्रधानांसह सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. 

सोमवारी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान हसन दियाब यांनी सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली. देशातल्या जनतेना बदल हवा आहे आणि लोकांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही राजीनामा देत आहोत, असं दियाब म्हणाले. त्यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे. दियाब यांच्या आधी मंत्रिमंडळातल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले होते. मात्र त्यानंतरही जनक्षोभ कायम होता. सरकारनं पायउतार व्हावं, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. 




गेल्या मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये स्फोट झाले. त्यामध्ये २२० जणांचा मृत्यू झाला आहे. बैरुतचे राज्यपाल मरवान अबूद यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर ११० जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. यातील बहुतांश जण परदेशी कर्मचारी आणि ट्रक चालक आहेत. या स्फोटांमध्ये जवळपास ६ हजार जण जखमी झाले. या स्फोटांनंतर लेबनॉनसमोरी आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. लेबनॉनमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे.

Read in English

Web Title: Lebanon government resigns amid outrage over Beirut blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.