लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 07:50 PM2024-09-18T19:50:45+5:302024-09-18T19:50:58+5:30
Lebanon Pager Blast: लेबनान पेजर ब्लास्ट के बाद हिजबुल्लाह ने इजरायल के खिलाफ पहली बार सीमा पार हमलों को अंजाम दिया है.
Lebanon Pager Blast : लेबनॉन पेजर ब्लास्टनंतर हिजबुल्लाहने इस्रायलविरुद्धयुद्धाची घोषणा केली आहे. हिजबुल्लाहने बुधवारी (18 सप्टेंबर) इस्त्रायली सीमा चौक्यांवर शेकडो रॉकेट डागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाहने पहिल्यांदाच इस्रायलवर सीमापार हल्ले केले आहेत. दरम्यान, लेबनॉन पेजर ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3,000 हून अधिक लोक जखमी आहेत. तर, सीरियामध्येही 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो.
काल म्हणजेच मंगळवारी (17 सप्टेंबर) लेबनॉनमध्ये साखळी पेजर स्फोट झाले. पेजर हे एक वायरलेस टेलिकम्युनिकेशन डिव्हाईस आहे, जे व्हॉइस आणि टेक्स्ट्स मेसेज पाठवण्यासाठी वापरले जाते. या स्फोटाचे तार इस्रायलशी जोडले जात आहे. या हल्ल्यात इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लाने केला आहे. मात्र, इस्रायलच्या लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हिजबुल्लाह सैनिक पेजर का वापरतात?
हिजबुल्ला संघटनेत संवादासाठी पेजर वापरते. मोबाईलमुळे लोकेशन सापडू शकते, त्यामुळे सैनिक संवादासाठी पेजर वापरतात. दरम्यान, हे पेजर कसे फाडले गेले. याबाबत हिजबुल्लाने अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. लिथियम बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. पण, तज्ञांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पेजर गरम होऊन फुटणे अशक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रत्येक पेजरमध्ये 3 ग्रॅम गनपावडर होते
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगळेच कारण दिले जात आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने 5000 पेजर्समध्ये स्फोटके पेरल्याचा दावा केला जातोय. मोसादने प्रत्येक पेजरमध्ये 3 ग्रॅम स्फोटक पेरले होते. आता खरे कारण काय, हे लवकरच समोर येईल. मात्र, या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह पुन्हा आमने सामने आले आहेत. इस्रायलनेही सीमेवर आपले सैन्य वाढवले असून, युद्धासाठी अलर्ट राहण्यास सांगितले आहे.