सिंगापूरचे ली कुआन निवर्तले

By admin | Published: March 24, 2015 02:21 AM2015-03-24T02:21:23+5:302015-03-24T02:21:23+5:30

सिंगापूरच्या राजकारणावर ५० वर्षांहून अधिक काळ प्रभाव असणारे नेते व सिंगापूरचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यु (९१) यांचे आज निधन झाले.

Lee Kuan Outletley of Singapore | सिंगापूरचे ली कुआन निवर्तले

सिंगापूरचे ली कुआन निवर्तले

Next

सिंगापूर : सिंगापूरच्या राजकारणावर ५० वर्षांहून अधिक काळ प्रभाव असणारे नेते व सिंगापूरचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यु (९१) यांचे आज निधन झाले. ब्रिटिश वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरचा त्यांनी कायापालट केला व जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र आणि आर्थिक महासत्ता असे नवीन समृद्ध रूप या छोट्या देशाला मिळवून दिले.
सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला, असे सरकारने जाहीर केले आहे. ५ फेब्रुवारीपासून न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने ते रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात होते.
देशाचे पंतप्रधान व ली कुआन यांचे पुत्र ली हेसिन लुंग यांनी अत्यंत भावनाशील होऊन पित्याला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, शून्यातून या देशाला समृद्ध रूप दिले, सिंगापुरीयन म्हणून अभिमानाने उभे राहण्याची शक्ती त्यांनी आम्हाला दिली, असे पंतप्रधान ली म्हणाले.
२५ ते २८ मार्चपर्यंत ली कुआन यांचा मृतदेह संसद गृहात ठेवला जाणार आहे. सिंगापूरमध्ये सात दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. ली यांचा अंत्यविधी २९ मार्च रोजी केला जाणार आहे.
३१ वर्षे सिंगापूरचे पंतप्रधान असणारे ली हे सिंगापूरच्या समृद्धीचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असत. राजकीय विरोधकांना त्यांनी दिलेली कठोर वागणूक व माध्यमांवर त्यांचे असणारे नियंत्रण यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.
१९२३ मध्ये जन्मलेले ली १९५९ साली पंतप्रधान बनले तेव्हा सिंगापूर हा जमिनीचा छोटा तुकडा होता. उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते व चिनी, मलय व भारतीय नागरिकांची मिश्र लोकसंख्या होती. १९६५ साली मलेशियापासून विभक्त झाल्यानंतर आलेल्या कटू अनुभवाचे ते साक्षीदार होते.
स्वच्छ व सक्षम सरकार हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सिंगापूरकडे आकर्षित झाल्या. लोकांचे राहणीमान उंचावले व अल्पावधीतच तिसऱ्या जगातील देशापासून जगातील समृद्ध देशाकडे त्यांनी वाटचाल केली.
करिष्माई व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ली यांनी पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी सहसंस्थापित केली. १९५९ पासून हा पक्ष सत्तेवर आहे. (वृत्तसंस्था)

४कुआन यांच्या निधनामुळे दु:ख झाले. आशिया खंडाला एक महान नेता गमावल्याचे दु:ख आहे.
प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
४ली कुआन हे नेत्यातील सिंह होते. राजकीय नेता म्हणून त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. त्यांचे जीवन हे मौल्यवान धडे असून, त्यांच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

४ली कुआन यांच्या निधनामुळे दु:ख होत आहे. आशियातील नेत्यांशी जवळचे संबंध ठेवणाऱ्या या नेत्याने राष्ट्रनिर्मितीचे काम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केले.
सोनिया गांधी,काँग्रेस अध्यक्ष

४ली कुआन हे दूरदर्शी नेते होते. १९६५ साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचा समावेश जगातील एका समृद्ध देशात करण्यात ली यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
बराक ओबामा, अमेरिकी अध्यक्ष

 

Web Title: Lee Kuan Outletley of Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.