माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 01:10 PM2020-06-13T13:10:30+5:302020-06-13T13:20:26+5:30
समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढता यावेत यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मॉस्को - केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. अशातच प्राण्यांचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढता यावेत यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काही आठवड्यांचाच हा छावा असून त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला त्याच्या आईपासून दूर करण्यात आले. पर्यटक छाव्यासोबत फोटो काढत असताना तो धावू नये यासाठी त्याचे पाय तोडल्याचा भयंकर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, सिंबा नावाच्या या छाव्याची प्रकृती ढासळत चालली होती. दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्यामुळे त्याला उठता येत नाही. छाव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या युलिया अगिवा यांनी सिंबाच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. अनेकदा वन्य प्राण्यांची हाडे मोडली जातात. जेणेकरून हे पर्यटकांना पाहून पळून जाता कामा नये.
प्राण्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रपती पुतीन यांना इकॉलॉजिस्टसोबत झालेल्या बैठकीत या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : हेल्थ अलर्ट! कोरोनाच्या संकटात 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात https://t.co/uZrmr1P6k7#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2020
CoronaVirus News : सर्दी झाली तरी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची नाही गरज कारण...https://t.co/pbL9edRjf1#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई
पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू