सोशल मीडियावर हिट झालं त्रासलेल्या आईनं मुलाला लिहिलेलं पत्र

By Admin | Published: September 19, 2015 04:41 PM2015-09-19T16:41:16+5:302015-09-19T16:41:16+5:30

मी आता कमवायला लागलोय आणि स्वतंत्र आहे असं सांगणा-या १३ वर्षांच्या मुलाला युरोपमधल्या वैतागलेल्या आईने स्वातंत्र्याचा धडा नावाचं एक पत्र लिहिलं

The letter written by the child to the miserable mother was hit on the social media | सोशल मीडियावर हिट झालं त्रासलेल्या आईनं मुलाला लिहिलेलं पत्र

सोशल मीडियावर हिट झालं त्रासलेल्या आईनं मुलाला लिहिलेलं पत्र

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मी आता कमवायला लागलोय आणि स्वतंत्र आहे असं सांगणा-या १३ वर्षांच्या मुलाला युरोपमधल्या वैतागलेल्या आईने स्वातंत्र्याचा धडा नावाचं एक पत्र लिहिलं आणि आपल्या भावनांना मोकळं व्हायला वाव दिला. आज फेसबुकवरल्या त्या पत्राला लाखाच्या घरात समदु:खी मातांनी व नेटिझन्सनी शेअर केलं असून ही समस्या घराघरात कशी शिरलीय याची चुणूक दाखवली आहे.
इस्टेला हाविशम असं सिंगल पेरेंट असलेल्या या महिलेचं नाव असून अरॉन असं तिच्या मुलाचं नाव आहे. अरॉन आईला एक रुममेटसारखी वागणूक देतो आणि तिचे नियम पाळण्यास नकार देताना मी यू ट्यूबवर पैसे कमवू शकतो. मी स्वतंत्र आहे आणि गृहपाठ, अभ्यास वगैरे गोष्टींची अपेक्षा बाळगू नको आदी सांगतो.
वैगातलेल्या इस्टेला फेसबुकचा आधार घेतात आणि मुलाला उद्देशून पत्र लिहितात. तू स्वत:ला स्वतंत्र समजतोस ना, मग खोलीचं भाडं, विजेचा खर्च, इंटरनेटचा चार्ज आणि अन्नाची किंमत या गोष्टीदेखील दे असं त्या पत्रात लिहितात. 
राहण्यापोटी ४३० डॉलर्स, विजेच्या बिलापोटी ११६ डॉलर्स, इंटरनेचसाठी २१ डॉलर्स आणि जेवणाचे १५० डॉलर्स एवढा खर्च येतो. वेळच्यावेळी साफसफाई कर अन्यथा त्यासाठी ३० डॉलर्स द्यावे लागतिल,असंही ती पुढे म्हणते.
मुलासाठी आपण काय काय विकतं घेतलं याची जंत्रीही त्यांनी दिली आहे, 
अर्थात, पत्राचा समारोप करताना एक रुममेट म्हणून न राहता तुला पुन्हा माझं मूल म्हणून रहायचं असेल तर वर दिलेल्या अटींचा आपण पुनर्विचार करू असंही इस्टेला सुचवतात आणि मुलाच्या मनपरीवर्तनाची आशा बाळगतात. गेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र लिहिलं आणि ते अक्षरश: लाखांच्या संख्येनं शेअर झालं, त्याची चर्चा झाली.
आता ताज्या पोस्टमध्ये इस्टेला म्हणतात, या पोस्टनंतर मुलाच्या वागणुकीत बदल झालाय आता मी त्याला काही सांगितलं तर तो ऐकतो...

Web Title: The letter written by the child to the miserable mother was hit on the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.