पोलीस प्रशिक्षण केंद्रावर लिबियात हल्ला : ६० ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 03:20 AM2016-01-08T03:20:35+5:302016-01-08T03:20:35+5:30
लिबियातील पश्चिम भागात असलेल्या जिल्टेन शहरात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या आत्मघातकी ट्रक बॉम्बहल्ल्यात किमान ६० जण ठार आणि अन्य २०० जण जखमी झाले.
त्रिपोली : लिबियातील पश्चिम भागात असलेल्या जिल्टेन शहरात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या आत्मघातकी ट्रक बॉम्बहल्ल्यात किमान ६० जण ठार आणि अन्य २०० जण जखमी झाले.
राजधानी त्रिपोलीपासून १७० कि.मी. अंतरावर ही घटना घडली. पाणीपुरवठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकर-ट्रकचा हल्लेखोराने यासाठी वापर केला. या टँकरमध्येच त्याने स्फोटके भरून आणली होती. जिल्टेन हे शहर किनारपट्टीवर आहे. आत्मघातकी हल्ला झाला तेव्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात ४०० जण होते. त्यात प्रामुख्याने तटरक्षक दलातील जवानांचा सामावेश होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या स्फोटात किमान ५० ते ५५ लोक ठार, तर अन्य १०० जण जखमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अमर मोहंमद अमर यांनी सांगितले.