मृत्यूनंतरही काही काळ असते जीवन
By Admin | Published: October 9, 2014 03:07 AM2014-10-09T03:07:58+5:302014-10-09T03:07:58+5:30
मृत्यूनंतरही जीवन काही काळ अस्तित्वात असू शकते, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने गेले चार वर्षे हा अभ्यास केला आहे.
लंडन : मृत्यूनंतरही जीवन काही काळ अस्तित्वात असू शकते, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने गेले चार वर्षे हा अभ्यास केला आहे.
हृदयविकाराच्या धक्क्याने मरणाच्या दारापर्यंत जाऊन परत आलेल्या लोकांचे अनुभव ते विचारत आहेत. अशा ४० टक्के लोकांनी ते मरण पावल्याचे जाहीर झाल्यानंतर एक प्रकारची जाणीव जागरूकता अनुभवली आहे.
सध्याच्या वैद्यकीय धारणेनुसार हृदयाची धडधड थांबल्यानंतर २० ते ३० सेकंदात मेंदू थांबतो व अल्पावधीत या दोन्ही प्रक्रिया घडत असल्याने त्यातून जाणाऱ्या व्यक्तीला कोणतीही जाणीव राहणे शक्य नाही; पण मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन तीन मिनिटानंतर जिवंत झालेल्या एका रुग्णाने या तीन मिनिटात काय घडले याचे अचूक वर्णन केले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना मृत्यूनंतरच्या जीवनाचे काही पुरावे मिळाले.
(वृत्तसंस्था)