वायुप्रदूषणामुळे जगात आयुर्मान ३ वर्षांनी होतेय कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 06:01 AM2020-03-04T06:01:16+5:302020-03-04T06:01:25+5:30
‘कार्डिओवास्कुलर रिसर्च’मध्ये प्रकाशित या निष्कर्षात असेही म्हटले आहे की, जग प्रदूषणाच्या साथीचा सामना करीत आहे.
बर्लिन : वायू प्रदूषणामुळे जगातील लोकांचे आयुर्मान जवळपास ३ वर्षांनी कमी होत आहे. जर्मनीतील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री’च्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, युद्ध किंवा अन्य प्रकारचा हिंसाचार आणि मलेरिया, एड्स व धूम्रपानामुळे होणाऱ्या रोगांपेक्षा प्रदूषणामुळे आयुष्य
घटण्याचे प्रमाण अधिक आहे.
‘कार्डिओवास्कुलर रिसर्च’मध्ये प्रकाशित या निष्कर्षात असेही म्हटले आहे की, जग प्रदूषणाच्या साथीचा सामना करीत आहे. या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, जगात २०१५ मध्ये प्रदूषणामुळे ८८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत मलेरियामुळे ६ लाख मृत्यू झाले, तर हिंसाचारामुळे (युद्धासह) ५ लाख ३० हजार मृत्यू झाले. यात असेही आढळून आले की, हृदयरोग, मेंदूशी संबंधित रोगांसाठीही वायू प्रदूषण जबाबदार आहे. वायू प्रदुषणामुळे श्वसन मार्गातील संसर्ग, फुμफुसाचा कॅन्सर, स्ट्रोक आणि अन्य आजार होतात. वायू प्रदूषणामुळे काही देशांत वृद्ध लोकांचे आयुर्मान कमी झाल्याचेही दिसून आले, तर आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कमी उत्पन्नाच्या देशात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही दिसून आले. जागतिक स्तरावर वायू प्रदूषणाचे ७५
टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील व्यक्तींचे होतात.
मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीतील प्रोफेसर जोस लेलिवेल्ड म्हणतात की, तंबाखूमुळे होणारे नुकसान वा अन्य कारणास्तव होणारे मृत्यू यापेक्षा वायू प्रदूषणामुळे होणारी हानी आणि मृत्यू हे अधिक आहेत. याच इन्स्टिट्यूटमधील थॉमस मुन्जेल यांचे म्हणणे आहे की, वायू प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच अधिक
आहे. वायू प्रदूषण आणि धूम्रपान दोन्हीही रोखले जाऊ शकते; पण मागील दशकात वायू प्रदूषणाकडे खूपच कमी लक्ष दिले गेले, असेही ते म्हणाले.
>लहान मुलांचाही मृत्यू
वायू प्रदूषणामुळे काही देशांत वृद्ध लोकांचे आयुर्मान कमी झाल्याचेही दिसून आले, तर आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कमी उत्पन्नाच्या देशात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही दिसून आले.