20 लाख मृत्यूंना जबाबदार खमेर रुज नेत्यांना जन्मठेप
By Admin | Published: August 8, 2014 02:21 AM2014-08-08T02:21:22+5:302014-08-08T02:21:22+5:30
दोन बडय़ा खमेर रुज नेत्यांना कंबोडियातील संयुक्त राष्ट्र पुरस्कृत मानवताविरोधी गुन्हे लवादाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नुओन चिया (88) व खियू संफान (83) अशी नावे आहेत.
>नोम पेन्ह : दोन बडय़ा खमेर रुज नेत्यांना कंबोडियातील संयुक्त राष्ट्र पुरस्कृत मानवताविरोधी गुन्हे लवादाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नुओन चिया (88) व खियू संफान (83) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. नुआन हे पोल पॉटचे उपप्रमुख होते, तर खियू हे माओवादी सरकारचे प्रमुख होते.
खमेर रुज राजवटीदरम्यानच्या गुन्हय़ांसाठी दोषी ठरविण्यात आलेले ते पहिले प्रमुख नेते आहेत. खमेर रुज राजवटीत जवळपास 2क् लाख नागरिक भूक, अत्याधिक काम किंवा राष्ट्राचे शत्रू म्हणून ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडामुळे मारले गेले होते. 1975 ते 1979 दरम्यानच्या या राजवटीत कंबोडियन समाजाला कृषिप्रधान बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शहरे रिकामी करून तेथील रहिवाशांना बळजबरीने ग्रामीण सहकारी संस्थांत ढकलण्यात आले होते. यातील अनेक जण अत्याधिक श्रमामुळे तर इतर अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर भूकेने मृत्युमुखी पडले होते. चार हिंसक वर्षात खमेर रुजने आपल्या सर्व विरोधकांना ठार मारले होते.
यातील बहुतांश बुद्धिजीवी, अल्पसंख्याक, माजी अधिकारी व त्यांचे कुटुंबिय होते. नुआन चिया हे या शासनाचे वैचारिक आधारस्तंभ होते तर खियू संफान हे या राजवटीचा लोकचेहरा होते. या दोघांनी धोरणो ठरवून त्यांच्या हिंसक अंमलबजावणीस सहकार्य केले, असा युक्तिवाद वकिलांनी केला.
दोघांनी त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. गेल्यावर्षी त्यांनी पश्चाताप व्यक्त केला होता. मात्र, त्याचबरोबर आपण हत्येचे आदेश दिले नव्हते तसेच याची आपणास कल्पना नव्हती, असेही स्पष्ट केले होते.
लवादाने गेली तीन वर्षे खमेर रुज राजवटीत संपूर्ण कुटुंब गमावलेल्या व्यक्तींची आपबिती ऐकून घेतली. (वृत्तसंस्था)
4‘माङया हृदयात आजही संताप खदखदत आहे’, अशी प्रतिक्रिया पतीसह चार मुले गमावलेल्या सुओन मोम (75) यांनी व्यक्त केली. ‘नोम पेन्ह सोडल्याचा शेवटचा दिवस आजही माङया स्मरणात आहे. पोटात अन्नाचा कण नव्हता आणि तहानेने जीव व्याकूळ झालेला असताना मी रस्ता तुडवत पुढे जात होते. तो दिवस आजही मला हलवून सोडतो’, असे सुओन म्हणाल्या.
1 खमेर रुज ही सलोथ सार (पोल पॉट) यांच्या नेतृत्वाखाली कंबोडियावर 1975 ते 1979 दरम्यान राज्य करणारी माओवादी राजवट होती.
2 कृषिप्रधान समाजनिर्मितीसाठी
धर्म, शाळा व चलन गुंडाळण्यात आले.
3 या काळात सुमारे 2क् लाख नागरिक
भूक, अतिश्रम व मृत्युदंडामुळे मारले गेल्याचे
मानले जाते.
4 1979 मध्ये व्हिएतनामने केलेल्या आक्रमणात खमेर रुजचा पराभव झाला. त्यानंतर पोल पॉटने पलायन केले तो 1997 र्पयत मुक्त जीवन जगला. 1998 मध्ये त्याचा मृत्यू झाला.