मंगळावरही जीवसृष्टी? सापडले पाण्याचे पुरावे, ६५ फूट खोल मातीत आढळली आर्द्रता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 08:07 AM2024-01-29T08:07:38+5:302024-01-29T08:07:54+5:30
Life on Mars: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली.
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली.
नासाचा पर्सव्हरन्स रोव्हर २०२१ मध्ये मंगळाचा सर्वात धोकादायक पृष्ठभाग असलेल्या जाजिरो क्रेटरवर उतरला होता. तेथील खडकांचे तसेच मातीचे नमुने घेण्यात आले. त्यानुसार पृष्ठभागाच्या ६५ फूट खोल मातीच्या कणांमध्ये आर्द्रताही आढळून आली. क्रेटरच्या ठिकाणी पूर्वी एक मोठा तलाव होता. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असल्यास, त्याचे पुरावे जीवाश्मांच्या स्वरूपात सापडतील, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व्यक्त केली आहे.