३८ हजार वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनावर प्रकाश

By admin | Published: January 30, 2017 12:38 AM2017-01-30T00:38:20+5:302017-01-30T00:38:20+5:30

खडकाच्या गुहेमध्ये जंगली गायीभोवती ठिपक्यांची रांग असलेली कोरून काढलेली ३८ हजार वर्षांपूर्वीची कलाकृती शास्त्रज्ञांना आढळली असून

Light on human life 38 thousand years ago | ३८ हजार वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनावर प्रकाश

३८ हजार वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनावर प्रकाश

Next

न्यूयॉर्क : खडकाच्या गुहेमध्ये जंगली गायीभोवती ठिपक्यांची रांग असलेली कोरून काढलेली ३८ हजार वर्षांपूर्वीची कलाकृती शास्त्रज्ञांना आढळली असून, त्यामुळे त्याकाळच्या आधुनिक मानवाचे जीवन कसे होते, यावर प्रकाश पडण्यास मदत होईल.
या शोधामुळे कला आणि दागदागिन्यांचे संपूर्ण युरोपमध्ये नक्षीकाम कसे होते यावर नव्याने प्रकाश पडू लागेल. युरोपमध्ये त्या काळात पहिला आधुनिक मानव प्रवेश करीत होता तेव्हा युरोपखंड पश्चिमेकडे व उत्तरेकडे पांगत होता, असे रँडॉल व्हाईट यांनी सांगितले. व्हॉईट हे न्यूयॉर्क युनिव्हरसिटीत मानवाच्या उगम, विकास व संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सिेस व्हिझेर व्हॅलीत उत्खननाचे काम करण्यात आले. अ‍ॅब्री ब्लँकार्ड हे फ्रेंचमधील ठिकाण असून तेथे उघड्यावर पडलेला पण कोरीव काम केलेला स्लॅब असून त्यावर जंगली गायींची एकामध्ये एक अशा प्रतिमा आहेत. त्यांच्याभोवती टिंबांच्या रांगा आहेत. हे उत्खनन विसाव्या शतकाच्या प्रारंभी झाले होते.

Web Title: Light on human life 38 thousand years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.