हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 07:20 PM2024-05-24T19:20:49+5:302024-05-24T19:21:43+5:30

Israel Hamas War : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात हमासच्या दहशतवाद्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Limits crossed by Hamas; Israeli woman was gang-raped and brutally murdered | हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून...

हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून...

Hamas Atrocities : इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास, यांच्यातील संघर्ष अद्याप शमलेला नाही. सातत्याने हमास इस्रायलवर छोटे-मोठे हल्ले करत असतो. हमासने तर इस्रायलच्या सीमेत घुसून अत्याचाराच्या सीमा ओलांडल्या. सध्या एका हमास दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या एका गंभीर गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

या व्हिडिओमधील तरुणाने आपल्या वडिलांसोबत केलेल्या सामूहिक बलात्काराची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, त्या दोघांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान एका इस्रायली तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. जमाल हुसैन अहमद रादी(वय 47) आणि अब्दुल्ला(वय 18) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

काय म्हणाला अब्दुल्ला?
या दहशतवादी पिता-पुत्राने 7 ऑक्टोबर रोजी किबुत्झ नीरमध्ये हे क्रूर कृत्य केले. अब्दुल्ला म्हणाला की, आधी माझ्या वडिलांनी महिलेवार बलात्कार केला, त्यानंतर मी आणि माझ्या चुलत भावाने केला. त्यानंतर वडिलांनी तिची हत्या केली. एका रिपोर्टनुसार, अब्दुल्लाने आणखी एका मुलीवर आणि त्याच्या वडिलांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याचे कबूल केले आहे.

त्या दिवशी काय घडले?
इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षादरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी 400 लोकसंख्या असलेल्या किबुत्झ नीरमध्ये मोठा नरसंघार केला होता. त्या हल्ल्यात किमान 20 लोक मारले गेले, तर 80 जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन गाझा येथे नेले होते. तिथे त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करण्यात आले.
 

Web Title: Limits crossed by Hamas; Israeli woman was gang-raped and brutally murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.