ऐका हे खरंय! 21 वर्षीय तरुणानं दिला मुलीला जन्म
By admin | Published: July 9, 2017 06:41 PM2017-07-09T18:41:07+5:302017-07-09T19:28:10+5:30
आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे. इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे. इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे. त्या पुरुषाचे नाव हायडेन क्रॉस असे आहे. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता तीनवर्षापूर्वी त्याने लिंग परिवर्तन करून पुरुष बनला. हायडेन क्रॉसने 16 जून रोजी मुलीला जन्म दिला. लिंग परिवर्तन करून घेऊन (स्त्रीतून पुरूष) गरोदर राहिलेला हा इंग्लडमधील पहिला पुरूष आहे. त्याने ग्लोऊसेस्टरशायरमधील रॉयल हॉस्पीटलमध्ये जन्म दिला.
हायडेन क्रॉस यांनी फेसबुकद्वारे वीर्यदाता मिळवल्यावर त्यांना गर्भधारणा झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात क्रॉस यांनी मी गरोदर आहे असे जाहीर केले होते. मला मूल आधी हवे असल्यामुळे मी माझी पुरूष होण्याची प्रक्रिया थाबंवत असल्याचेही म्हटले होते.क्रॉस यांनी आपली बिजांड न गोठवण्याचा निर्णय घेतला कारण एनएचएसने त्यांना त्याचे चार हजार पौंड द्यायला नकार दिला.
हायडेन क्रॉस यांची आजी पॅम एजवर्थ यांनी मुलगी जन्माला आल्याची घोषणा शनिवारी रात्री केली व हायडेन व नवे बाळ छान असल्याचे म्हटले. हायडेन क्रॉस यांची आई ख्रिस्तीन एजवर्थ हिनेदेखील दोन दिवस आधी तिच्या पाचव्या अपत्याला जन्म दिला. पॅम एजवर्थ म्हणाल्या की, मी खूप आनंदी आहे. मी पुन्हा एकदा आजी आणि अवघ्या 48 तासांत पणजी बनली आहे. दोन्ही बाळंतिणी व बाळे छान आहेत.
आणखी वाचा -
गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर
गरोदर आहात? मोबाईलचा वापर कमी करा, अन्यथा..