भयंकर! बूट घालताच 7 वर्षांचा मुलगा वेदनेने कळवळला; एका पाठोपाठ आले 7 हार्ट अटॅक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:57 PM2022-11-03T16:57:07+5:302022-11-03T17:07:32+5:30

सात वर्षीय मुलाला विंचवाने दंश केल्यानंतर हार्ट अटॅक आला आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

little boy dies from multiple heart attacks after yellow scorpion bite brazil | भयंकर! बूट घालताच 7 वर्षांचा मुलगा वेदनेने कळवळला; एका पाठोपाठ आले 7 हार्ट अटॅक अन्...

भयंकर! बूट घालताच 7 वर्षांचा मुलगा वेदनेने कळवळला; एका पाठोपाठ आले 7 हार्ट अटॅक अन्...

Next

ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विंचू चावल्यानंतर एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सात वर्षीय मुलाला विंचवाने दंश केल्यानंतर हार्ट अटॅक आला आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला. विंचू चावल्यानंतर त्याने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. द इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाला चावलेला विंचू हा टिटियस सेरूलेटस (Tityus Serrulatus) या नावाने ओळखला जातो. 

लुईस मिगेल फुर्टाडो असं या सात वर्षीय मुलाचं नाव होतं. मुलाचं कुटुंब एका कँपिंग ट्रिपची तयारी करत होतं. सात वर्षांचा लुईसही त्याच्या कुटुंबासह फिरायला जाण्यास निघत होता. त्याने बुटामध्ये पाय घातला. त्यावेळी विंचवाने त्याच्या पायाला दंश केला. त्याला असह्य वेदना झाल्या. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. थोड्या वेळाने लुईसचा पाय लाल झाला. लुईसच्या आईने बूट तपासला. 

बुटामध्ये त्यांना एक विषारी विंचू दिसला. तो ब्राझिलियन यलो प्रजातीचा होता. हा विंचू Tityus Serrulatus नावाने ओळखला जातो. हा सर्वात विषारी विंचू म्हणून देखील ओळखला जातो. या विंचवाने दंश केल्यानंतर हमखास मृत्यू होतो. अनेकांचा याआधी मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, लुईसच्या आई-बाबांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

लुईसवर रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती सुधारू लागली. रात्रीच्या सुमारास त्याने डोळे उघडले. मात्र त्यानंतर त्याला एका पाठोपाठ एक असे सात हार्ट अटॅक आले. 25 ऑक्टोबरला लुईसचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: little boy dies from multiple heart attacks after yellow scorpion bite brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.