टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 06:49 AM2024-01-14T06:49:48+5:302024-01-14T06:59:28+5:30

अमेरिकेतील १० राज्यांमध्ये या सोहळ्यानिमित्त मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या अमेरिकेतील शाखेने दिली.

Live broadcast of Pran Pratistha in Times Square, Hoardings in 10 US states | टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज

टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज

वॉशिंग्टन : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी नव्हे तर जगभर सुरू आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगभरातील भारतीय या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम स्क्वेअरमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

अमेरिकेतील १० राज्यांमध्ये या सोहळ्यानिमित्त मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या अमेरिकेतील शाखेने दिली. 

या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अमेरिकेतील १० राज्यांमध्ये ४० मोठी होर्डिंग्ज लावली आहेत. टेक्सास, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, जॉर्जिया आदी राज्यांमध्ये १५ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Web Title: Live broadcast of Pran Pratistha in Times Square, Hoardings in 10 US states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.