YouTube वर लवकरच दिसणार लाइव्ह टीव्ही

By admin | Published: March 1, 2017 07:53 AM2017-03-01T07:53:41+5:302017-03-01T09:11:22+5:30

डिजिटल माध्यमांच्या क्रांतीचं जाळं दिवसेंदिवस वेगानं विस्तारत आहे.

Live TV will soon appear on YouTube | YouTube वर लवकरच दिसणार लाइव्ह टीव्ही

YouTube वर लवकरच दिसणार लाइव्ह टीव्ही

Next

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 1- डिजिटल माध्यमांच्या क्रांतीचं जाळं दिवसेंदिवस वेगानं विस्तारत आहे. स्वतःची कला जगासमोर नेण्यासाठी आताची स्मार्ट पिढीसुद्धा इंटरनेटचा प्रभावी वापर करताना पाहायला मिळते आहे. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी यू ट्युबनं एक पाऊल पुढे टाकत लाइव्ह टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. यू ट्युबनं अमेरिकेतल्या मुख्य 4 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार केला असून, यात अमेरिकन प्रसारण नेटवर्कसह केबल चॅनेलवाल्यांचाही सहभाग आहे. पुढच्या महिन्यापासून अमेरिकेत लोकांना यू ट्युबवर लाइव्ह टीव्ही पाहता येणार आहे, असं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे. 

मात्र त्यासाठी ग्राहकांना महिन्याला 35 डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार आहेत, अशी माहिती यू ट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजसिस्की यांनी दिली आहे. लॉस एन्जलिसमधल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यू ट्युब लाइव्ह व्हिडीओसाठी जवळपास 40 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात असून, त्यात व्हॉल्ट डिस्नी ईएसपीएनचाही समावेश आहे. यू ट्युब अमेरिकेतल्या डिश नेटवर्क स्लिंग टीव्ही, एटी अँड टीएस डायरेक टीव्ही आणि सोनी कॉर्प प्ले स्टेशनशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यू ट्युबला ग्राहकांना चांगल्या ऑफर्सही द्याव्या लागणार आहेत.

गुगलनं यु ट्यूबच्या माध्यमातून एक व्यासपीठच उपलब्ध करून दिलं असून, आता हे व्यासपीठ जगभर पसरलं आहे. यू ट्युबवर कोणीही वापरकर्ता पाहिजे ते व्हिडीओ पाहू शकतो किंवा त्यात बदल करू शकतो. मात्र यू ट्युब स्वतः कोणतेही व्हिडीओ तयार करत नाही. डिजिटल माध्यमांत यू ट्युब हाताळणारा मोठा वर्ग असल्यानं सहाजिकच यू ट्युबच्या लाइव्ह टीव्ही सुविधेलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Live TV will soon appear on YouTube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.