देशातील वृद्ध महिलांच्या नशिबी अगतिकतेचे जिणे!
By admin | Published: March 24, 2015 02:22 AM2015-03-24T02:22:48+5:302015-03-24T02:22:48+5:30
देशातील वृद्ध महिलांना वयासंबंधी भेदभाव, गैरव्यवहार आणि शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक सत्य अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आले आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला शांतीने जगता यावे यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू असतानाच देशातील वृद्ध महिलांना वयासंबंधी भेदभाव, गैरव्यवहार आणि शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक सत्य अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आले आहे. मूलभूत अधिकारांबद्दल असलेला जागरूकतेचा अभाव हे यामागील प्रमुख कारण आहे.
एजवेल रिसर्च अॅण्ड अॅडव्होकसी सेंटरतर्फे २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३३० जिल्ह्यांमधील ५०,००० वयोवृद्ध महिलांचे (२७,००० ग्रामीण आणि २२५०० शहरी) सर्वेक्षण करण्यात आले. भारतातील वयोवृद्ध महिलांसोबत होणारा पक्षपात हा या सर्वेक्षणाचा विषय होता.
दिल्लीसाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र अध्ययनात राजधानीतील अनियोजित आणि निम्ननियोजित वसाहतींमध्ये नियोजित वसाहतींच्या तुलनेत कुटुंबात वृद्ध महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले. २०११ च्या जनगणनेनुसार दिल्लीत ६.५ लाख वृद्ध महिला असून येथे वृद्धांची एकूण लोकसंख्या जवळपास ५१ टक्के आहे.
देशव्यापी सर्वेक्षणात ८९.३८ टक्के वृद्धांनी त्यांच्या कुटुंबात वृद्ध महिलेची स्थिती पुरुषांच्या तुलनेत अत्यंत वाईट असल्याचे सांगितले.
लिंगभेदामुळे भारतीय कुटुंबात वृद्ध महिलांचे वर्चस्व नेहमीच नाकारले जाते, असे ८४.०७ टक्के वृद्धांनी मान्य केले, तर केवळ ११.४६ टक्के लोकांनी (८.५ टक्के ग्रामीण व १५.५ टक्के शहरी) कुटुंबात वर्चस्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लिंगभेदाला महत्त्व दिले जात नाही, असे मत मांडले आहे.
अध्ययनात सहभागी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीने (५०.५९ टक्के) महिलांना वृद्धावस्थेमुळे एकाकी आणि उपेक्षित जीवन जगावे लागत असल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी ग्रामीण भागातील निम्म्या लोकांना मात्र वृद्ध महिलांचे एकाकीपण आणि लिंगभेदाचा काहीही संबंध नसल्याचे वाटते.
आरोग्याची काळजी घेण्याच्या मुद्यावर २२,५४९ वृद्ध महिलांसह ४३,०६३ वृद्धांनी कुटुंबात पुरुषांच्या आरोग्याची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी महिलांची घेतली जात नाही, असा दावा केला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
४८०.४९ टक्के लोकांच्या मते वृद्ध महिलांची आर्थिक स्थिती डळमळीत असते. १७.३६ टक्के लोकांना मात्र असे वाटत नाही.
४शहरी भागात वृद्ध महिलांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन ही सर्वसामान्य गोष्ट.
४वृद्ध पुरुषांच्या तुलनेत वृद्ध महिलांच्या मानवाधिकारांच्या पायमल्लीचे प्रमाण जास्त
४वृद्धापकाळात लिंगभेदाला सामाजिक आणि धार्मिक प्रथा कारणीभूत
४संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार यामुळे वृद्धांसोबत पक्षपातात वाढ
४सखोल अध्ययन केले असता ७०.२४ टक्के वृद्ध पुरुष आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे निदर्शनास आले; परंतु वृद्ध महिलांच्या बाबतीत मात्र आर्थिक स्वातंत्र्यांचे प्रमाण फक्त ५१.४५ टक्केच आहे. महिलांना रोजगाराच्या किं वा स्वबळावर उत्पन्नाच्या अत्यल्प संधी प्राप्त होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे ७९.७९ वृद्ध पुरुष आणि ८१.१७ वृद्ध महिलांनी सांगितले आहे.
हिमांशू रथ अग्रवाल, संस्थापक, एजवेल