द्वितीय विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब निकामी केला
By admin | Published: December 26, 2016 02:32 AM2016-12-26T02:32:18+5:302016-12-26T02:32:18+5:30
आॅग्सबर्ग येथील बीएमडब्ल्यूच्या क्षेत्रात आढळून आलेला जिवंत बॉम्ब निकामी करण्यचात तंत्राज्ञांना यश मिळाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
जर्मनी, दि. 26 - आॅग्सबर्ग येथील बीएमडब्ल्यूच्या क्षेत्रात आढळून आलेला जिवंत बॉम्ब निकामी करण्यचात तंत्राज्ञांना यश मिळाले. द्वितीय महायुद्धात विमानाद्वारे फेकलेला १.८ टनाचा जिवंत बॉम्ब आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. बॉम्ब निकामी करताना दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन आॅग्सबर्ग परिसरातील ५४ हजार लोकांना भारतीय वेळ रविवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत इतरत्र जाण्याचा इशारा दिला होता. संपूर्ण भाग निर्मनुष्य केल्यानंतर तज्ज्ञांनी रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास बॉम्बला निकामी करण्यात यश मिळविले.