जीवित कन्या देवीचे घर भूकंपात अप्रभावित

By admin | Published: May 2, 2015 11:11 PM2015-05-02T23:11:14+5:302015-05-02T23:11:14+5:30

नेपाळमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात दरबार स्क्वेअरमधील मोठमोठी मंदिरे जमीनदोस्त झाली असली तरी जीवित देवीच्या रूपात पूजा केल्या

Living Goddess of the Living Goddess earthquake is unaffected | जीवित कन्या देवीचे घर भूकंपात अप्रभावित

जीवित कन्या देवीचे घर भूकंपात अप्रभावित

Next

काठमांडू : नेपाळमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात दरबार स्क्वेअरमधील मोठमोठी मंदिरे जमीनदोस्त झाली असली तरी जीवित देवीच्या रूपात पूजा केल्या जाणाऱ्या ९ वर्षीय कन्येचे घर मात्र अप्रभावित राहिले आहे. त्या घराचे फारसे नुकसान झालेले नाही.
हे अशा देवीचे घर आहे की जेथे मुलींची सज्ञान होईपर्यंत पूजा केली जाते आणि त्यानंतर त्यांना बदलले जाते. २५ एप्रिल रोजी जेव्हा भूकंप झाला आणि सारा नेपाळ देश दोलायमान झाला तेव्हा अनेक प्राचीन मंदिरे जमीनदोस्त झाली; मात्र जीवित देवीच्या छोटेखानी घराला हलकेसे तडे गेले आहेत.
मागील देवींचे कुटुंबीयही प्रत्यक्ष भूकंपाच्या वेळी येथून हालले नव्हते. देवी आपला बचाव करील, अशी त्यांची श्रद्धा होती, म्हणून ते कुठेही सुरक्षित जागी पळाले नव्हते, असे सांगितले जाते.
मागील कुमारीच्या आईने सांगितले की, विद्यमान कुमारी देवीने आम्हाला सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे तर आम्हाला काहीच होणार नाही, असा विश्वास आहे.

Web Title: Living Goddess of the Living Goddess earthquake is unaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.