पाकमध्ये विकला जातोय एलओसी पिझ्झा...
By admin | Published: October 11, 2016 05:51 PM2016-10-11T17:51:18+5:302016-10-11T17:51:18+5:30
पाकिस्तानमधला सत्तार बक्स हा कॅफे एलओसी पिझ्झासाठी पाकमध्ये प्रसिद्ध आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - एलओसी म्हटलं की आपल्याला आठवते ती भारत - पाक मधील ती नियंत्रण रेषा आणि तिथे सुरु असलेला दोन्ही देशामधील तणाव. दोन्ही देशातील रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून गस्त देत असलेले सैनिक. पण पाकिस्तानमधल्या काही तरूणांच्या डोळ्यासमोर एलओसी म्हटले की येतो स्वादिष्ट पिझ्झा. पाकिस्तानमधला सत्तार बक्स हा कॅफे एलओसी पिझ्झासाठी पाकमध्ये प्रसिद्ध आहे.
या पिझ्झा बेसच्या अर्ध्या भागात मांसाहारी टॉपिंग तर अर्ध्या भागात शाकाहारी टॉपिंग आहे. या पिझ्झ्याच्या मांसाहारी भागात पाकिस्तानचा तर शाकाहारी भागा भारताचा झेंडा लावण्यात आला आहे. खरे तर दोन्ही देशांत शांतता नांदावी आणि लोक सुखी राहावे यासाठी या पिझ्झाची कल्पना सुचली असल्याचे सत्तार बक्स कॅफेने सांगितले.
उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्रइकनंतर दोन्ही देशांतील संबंध अधिकच ताणले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर जणू भारत पाकिस्तानचे शाब्दिक युद्धच पाहायला मिळते.