एफ-16 विमानाचं भारतात उत्पादन करण्यास लॉकहीड मार्टीन तयार
By Admin | Published: February 18, 2016 04:40 PM2016-02-18T16:40:49+5:302016-02-18T16:40:49+5:30
अमेरिकेतील लढाऊ विमाने बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टीनने भारतात एफ-16 विमाने तयार करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे
>ऑनलाइन लोकमत -
सिंगापूर, दि. 18 - अमेरिकेतील लढाऊ विमाने बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टीनने भारतात एफ-16 विमाने तयार करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. लॉकहीड मार्टीनने भारतात उत्पादन करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याच्या दोन्ही देशांतील चर्चैलाही पाठिंबा दिला आहे.
'आम्ही भारतात एफ-16 लढाऊ विमानाच उत्पादन करण्यास तयार आहोत, तसंच मेक इन इंडिया अभियानाला पाठिंबा देत आहोत' असं लॉकहीड मार्टीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फील शॉ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'दोन्ही देशांत सध्या सकारात्मक चर्चा सुरु आहे, मात्र हे कधीपर्यंत होईल हे आत्ताच सांगू शकत नसल्याचही' फील शॉ यांनी सांगितलं.
सध्या लॉकहीड मार्टीन महिन्याला एकाच विमान उत्पादन करते. लॉकहीड मार्टीने सहा C130J सुपर हर्क्यूलिस विमान भारताला पुरवली आहेत. तसंच पुढील वर्षात 6 हेलिकॉप्टरदेखील पाठवणार आहेत.