Loksabha Election Result 2019: अमेरिकेत थिएटरमध्ये पैसे देऊन लोक बघताहेत मोदींचा ऐतिहासिक विजय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 05:35 PM2019-05-23T17:35:00+5:302019-05-23T17:36:00+5:30

गुरूवारी सकाळपासून देशभरातील जनता टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियात लक्ष ठेवून आहेत. कारण आज लोकसभेचा निकाल जाहीर होतोय.

Loksabha Election Result 2019: In America Modi fans book cinema hall for lok sabha | Loksabha Election Result 2019: अमेरिकेत थिएटरमध्ये पैसे देऊन लोक बघताहेत मोदींचा ऐतिहासिक विजय!

Loksabha Election Result 2019: अमेरिकेत थिएटरमध्ये पैसे देऊन लोक बघताहेत मोदींचा ऐतिहासिक विजय!

Next

(Image Credit : NDTV.com)

गुरूवारी सकाळपासून देशभरातील जनता टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियात लक्ष ठेवून आहेत. कारण आज लोकसभेचा निकाल जाहीर होतोय. १७वी लोकसभा निवडणुकीत मोदींचा ऐतिहासिक विजय स्पष्ट झाला आहे. देशात ठिकठिकाणी भगवा झेंडा बघायला मिळत आहे. फटाके फोडले जात आहेत, मिठाई वाटली जात आहे. हा उत्साह केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. 

बुक केलं थिएटर

जगभरात भारतातील लोकसभा निवडणूक २०१९ निकालाची उत्सुकता बघायला मिळत आहे. अमेरिकेत तर एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट पाहण्यासाठी थिएटरचा पूर्ण हॉल बुक केलाय. यावर अनेकजण सकाळपासून मोदींच्या ऐतिहासिक विजयाचं प्रसारण बघत आहेत. 

रिपोर्टनुसार, भारतीय वंशाची रमेश नूने ही व्यक्ती अमेरिकेत राहते. तो एक आयटी प्रोफेशनल आहे. तसेच तो एक मोदी फॅन आहे. त्यामुळे त्यांनी १७व्या लोकसभेचा निकाल पाहण्यासाठी Minneapolis मध्ये एक अख्ख थिएटर बुक केलंय. मजेदार बाब ही आहे की, हा निकाल बघण्यासाठी लोक १५ डॉलर(जवळपास १ हजार रूपये) चं तिकीट खरेदी करत आहेत. रमेश थिएटरमध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून निकालाचे स्क्रीनिंग करत आहे. 

असे सांगितले जात आहे की, अमेरिकेतील वेळेनुसार, सायंकाळी ९.३० वाजता(भारतीय वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता) थिएटरमध्ये निकाल पाहण्यासाठी पोहोचले होते. जवळपास १५० पेक्षा अधिक लोक थिएटरमध्ये तिकीट खरेदी करून आले होते. 

अनेक राज्यात हेच चित्र

निवडणूक निकालाचं स्क्रीनिंग टेक्सास, इलिनोइस, फ्लोरिडा, वॉशिंग्टन डीसी, व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया आणि आणखीही काही राज्यात आयोजित करण्यात आलं आहे.   

Web Title: Loksabha Election Result 2019: In America Modi fans book cinema hall for lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.