लंडनचे विमानतळ रिकामे केले !
By admin | Published: October 22, 2016 02:43 AM2016-10-22T02:43:26+5:302016-10-22T02:43:26+5:30
सुमारे २६ प्रवाशांनी श्वासोश्वासास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने येथील शहर विमानतळ रिकामे करण्यात आले. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता हा प्रकार घडला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि.22 - सुमारे २६ प्रवाशांनी श्वासोश्वासास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने येथील शहर विमानतळ रिकामे करण्यात आले. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता हा प्रकार घडला. इमरजन्सी सेवेस तातडीने पाचारण करण्यात आले.सुमारे ५०० प्रवासी व विमानतळ कर्मचा-यांना बाहेर काढण्यात आले. २६ प्रवाशांपैकी दोघांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. अनेक प्रवाशांना अस्वस्थता जाणवत होती. या प्रकाराने अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली तर येणारी विमाने इतरत्र विमानतळावर वळविण्यात आली.रासायनिक गळतीमुळे हा प्रकार झाल्याचा अंदाज असून लंडनचे पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनेचा तपास करीत आहेत.