लंडनची आग आटोक्यात
By admin | Published: June 16, 2017 03:32 AM2017-06-16T03:32:19+5:302017-06-16T03:32:19+5:30
लंडनमधील २४ मजली निवासी संकुलाला बुधवारी लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. तथापि, अद्यापही इमारतीतून धूर येताना दिसत
लंडन : लंडनमधील २४ मजली निवासी संकुलाला बुधवारी लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. तथापि, अद्यापही इमारतीतून धूर येताना दिसत आहे. या दुर्घटनेत १७ लोक मृत्युमुखी पडले असून, काही लोक बेपत्ता असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. ती इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुर्दैवाने आता इमारतीत कोणीही जिवंत असण्याची आशा नाही. हे एक प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचे मदतकार्य असेल. मृतांची संख्या वाढू शकते. रात्रभर अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होते. बचाव पथके हवाई प्लॅटफॉर्मद्वारे इमारतीच्या प्रत्येक मजल्यात प्रकाश टाकून शोधमोहीम राबवित आहेत. ७४ जणांवर उपचार सुरू असून, १८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
- लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर इमारत आगीने वेढली गेल्यानंतर रमझान पाळण्यासाठी जागे राहिलेल्या मुस्लीम युवकांनी तातडीने मदत केल्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले. आग लागल्याचे दिसताच मुस्लीम युवकांनी लोकांना जागे केले. या इमारतीत १२0 कुटुंबे राहात होती. त्या तरुणांनी लोकांना इशारा दिला नसता तर मृतांची संख्या जास्त झाली असती, असे स्थानिक महिलेने सांगितले.