"लंडन मराठी संमेलन 2017"ची जय्यत तयारी

By admin | Published: May 18, 2017 02:33 PM2017-05-18T14:33:34+5:302017-05-18T14:37:13+5:30

लंडन हे फक्त लंडनकरांचं कधीच नव्हतं, लंडन हे नेहमीच सर्वांचं होतं आणि म्हणूनच हे आज ग्लोबल शहर म्हणून ओळखलं जात.

The "London Marathi Conference 2017" is a landmark preparation | "लंडन मराठी संमेलन 2017"ची जय्यत तयारी

"लंडन मराठी संमेलन 2017"ची जय्यत तयारी

Next
>- लंडन हे फक्त लंडनकरांचं कधीच नव्हतं, लंडन हे नेहमीच सर्वांचं होतं आणि म्हणूनच हे आज ग्लोबल शहर म्हणून ओळखलं जात.  अशा ह्या ग्लोबल शहरामध्ये आपल्या सर्वांसाठी ह्या वर्षी घेऊन येत आहोत एक दिमाखदार, धमाकेदार, सर्वसमावेशक "लंडन मराठी संमेलन" . महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापनवर्षा निमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ (LMS) हे साजरं करण्यात येत आहे. LMS हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठा पुढाकार आहे.  हा पुढे चालून जागतिक स्तरावर मिळालेल्या महाराष्ट्रीय लोकांचे यश, सिद्धी आणि भरभराट साजरा करण्याचं आणि प्रशंसा करण्याचं एक भव्य व्यासपीठ सिद्ध होणार आहे जेणे करून भारताबाहेर स्थित असलेल्या येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या भाषेचा अभिमान असेल.  
 
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा LMS हा महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत जल्लोष असणार आहे. LMS हे सर्व महाराष्ट्रीयांना आपल्यात दडलेलं कौशल्य, संगीत, कला आणि सर्जनशीलता सादर करण्याचं एक भव्य व्यासपीठ देणार आहे. ह्या संमेलनात विश्व स्तरावर उद्योजकतेमुळे यश मिळवलेल्या मराठी लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्तानं पहिल्यांदाच या शहरात "Global Marathi Entrepreneur Summit" भरणार आहे. या उद्योगिक परिषदेत उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन बुकिंग करावी - https://www.lms2017.org.uk/lms-business-summit/
 
ही परिषद प्रतिष्ठित अशा १, ""Canada Square,  Canary Wharf""च्या ३९व्या मजल्यावर थाटात आयोजित होणार आहे. ज्याच्यामध्ये भारताबरोबरच ब्रिटनमधील मंत्री आणि इतर प्रतिष्ठित उद्योजक उपस्तिथ असणार आहेत. ब्रिटनमध्ये बदललेल्या राजकीय सूत्रांमुळे इथे उद्योग करण्यासाठी बरेच मार्ग उघडले आहेत, ज्याचा फायदा महाराष्ट्रीय उद्योजकांना नक्कीच मिळेल. "मराठी"  म्हटलं की गणपती, भारूड, नाटक, लावणी, शिट्ट्या, पोहे, ढोल, ताशे, आशा, लता, सचिन जसे सहजपणे बोलून जातो त्याच सहजतेने "यशस्वी उद्योजक" देखील म्हणता आलं पाहिजे !, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 
 
उद्योजकते बरोबरच या संमेलनामध्ये Exclusive Cruise on River Thames असणार आहे. महाराष्ट्रीयन लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेने, कल्पकतेने आणि परिश्रमाने उभे केलेले आपापले साम्राज्य ऐश्वर्यात साजरे करण्याची आणि अनुभवायची  ही एक विलक्षण संधी आहे. ही cruise थेम्स नदीवरची सगळ्यात मोठी cruise असल्या कारणाने तिच्या जाण्यासाठी आणि येण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं Tower Bridge हे खास आपल्यासाठी उघडणार आहे, एकदा नव्हे पण दोनदा ! याची तिकीट देखील खालील लिंकरती उपलब्ध आहेत 
https://www.lms2017.org.uk/schedule-of-events/
 
अर्थातच या सर्व गोष्टींबरोबरच नंतर दोन दिवसांमध्ये भरगच्च करमणुकीचे कार्यक्रमदेखील पाहायला मिळणार आहेत.  यात संगीत असेल, विनोदी कार्यक्रम असतील आणि अर्थातच रुचकर आणि स्वादिष्ट मराठी जेवणाची मेजवानी असणर आहे. याच बरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या २-३ दिग्गजांसोबत मनमोकळ्या गप्पादेखील करण्यात येणार आहोत. 
 
पहिले जागतिक मराठी उद्योजकांचे अधिवेशन हे २ जून रोजी होणार आहे. यावेळी दुबई, अमेरिका, यूके, भारत आणि इतर देशातून उद्योजक येतील.  ३ आणि ४ जूनला एक मोठा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये यूके, यूरोप आणि इतर देशातून जवळजवळ १३०० लोकं येणे अपेक्षित आहे.  LMSच्या अनुषंगाने वेग वेगळे उपक्रम आयोजित केले आहेत, ज्यामुळे मुक्कामाबरोबर सहवासदेखील आनंदाचा होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे.  
 
""आमचं आणि आपलं हे समाजावर एक ऋण आहे, असं आम्ही समजतो आणि ते आम्ही वेळोवेळी फेडण्याचा प्रयत्न करतो. मग ते उद्योजकतेतून उद्भवणाऱ्या नौकऱ्या असू देत किंवा सामाजिक कार्य असू दे.  असाच एक उपक्रम आहे आणि तो म्हणजे अस्थिमज्जा देणगीचा (bone marrow donation)"", असे "महाराष्ट्र मंडळ लंडन"नं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 
आशिया खंडातील रहिवाशांमध्ये अस्थिमज्जा दाता नोंदणीपुस्तकात केवळ ५ पैकी एकानंच  नोंदणी केली आहे.  
 
हेच प्रमाण परदेशी लोकांमध्ये ५पैकी ४ असे आहे.  याचा अर्थ जीवघेण्या काही रोगांवर योग्य तो उपचार केल्यानंतर संपूर्णतः बरा होण्याचं प्रमाण आशियाई लोकांमध्ये केवळ २० टक्के आहे. LMSच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी १००१ दाता नोंदणीखात्यावर नोंदणीकृत करण्याचा चंग बांधला आहे जेणे करून अस्थिमज्जेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होईल अशी आमची आशा आहे.  
 

Web Title: The "London Marathi Conference 2017" is a landmark preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.