लंडन मराठी संमेलन : लोकल झुणका ग्लोबल दणका

By admin | Published: June 12, 2017 06:38 PM2017-06-12T18:38:15+5:302017-06-12T18:38:15+5:30

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. २ जून रोजी लंडन मराठी संमेलनाचे (LMS २०१७) आयोजन करण्यात आले होते.

London Marathi Conference: Local Jhunka Global Daga | लंडन मराठी संमेलन : लोकल झुणका ग्लोबल दणका

लंडन मराठी संमेलन : लोकल झुणका ग्लोबल दणका

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. २ जून रोजी लंडन मराठी संमेलनाचे (LMS २०१७) आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने (फिनेक्ट २०१७) झाली. तर दि. ३ आणि ४ जून रोजी विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली! याच्यात महाराष्ट्र मंडळ लंडन च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानण्यात आले.

ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषद
शुक्रवारी (दि. 2 जून रोजी), १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, येथे "एलएमएस"ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने झाली, यामध्ये 150हून अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित राहिले होते. दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी LMSच्या सदराखाली या परिषदेचे आयोजन आणि संचालन केले.

सर्वोत्कृष्ट जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा
ह्या परिषदेत जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यात खालील उद्योजकांना पारितोषिके देण्यात आली: एस्टॅब्लिश श्रेणी - गोल्ड पारितोषिक विजेते: श्री उमेश दाशरथी, सिल्वर: श्री संजीव नाबर, ब्रॉन्झ: श्रीकृष्ण गांगुर्डे, श्री अमरेंद्र कुलकर्णी आणि स्टार्ट-उप श्रेणीमध्ये - गोल्ड: श्री रोहन आणि श्री प्रियल नागरे, सिल्वर: विलास शिंदे, ब्रॉन्झ: श्री प्रसाद भिडे. ह्या स्पर्धेत १०० होऊन अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता आणि जजींग पॅनल वर होते: श्री शंतनू भडकमकर, श्रीराम दांडेकर, श्री चंद्रशेखर वझे, डॉ नितीन देसाई आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई. स्पर्धेचे समन्वय केले होते सौ श्वेता गानू ह्यांनी.

महाराष्ट्रीयन ऐश्वर्य - एक्सक्लुझिव्ह क्रूझ - डिक्सी क्वीन
पहिल्यांदाच सर्व क्रूझ ही LMSच्या उपास्तिथांसाठी होती ज्याच्यात २०० होऊन अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. ह्या अभूतपूर्व क्रूझवर ऐतिहासिक टॉवर ब्रिज हा दोनदा उघडण्यात आला आणि चार तासांच्या ह्या क्रूझवर जेवण आणि मौजमजा करण्यात आली.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ढोल बिट्स UKच्या चमूने ढोलताशाच्या गजरात केली ज्याच्यात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोमोडोर डेविड एलफोर्ड हे होते. रागसुधा विंजामुरी यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर सारंग कुसरे लिखितलंडन मराठी संमेलन ह्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत पोवाडा योगेश जोशी आणि त्यांच्या समुहाने गायला. कवी: सारंग कुसरे, संगीतकार व संयोजन: योगेश जोशी. गायक: योगेश जोशी, सुधांशु पटवर्धन, सौरभ वळसंकर, सौरभ सोनावणे, सारंग कुसरे, सारिका टेम्बे-जोशी, गायत्री सोनावणे, देवीना देवळीकर, दिया जोशी आणि कबीर पटवर्धन.

मुख्य अतिथी आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांची भाषणे
कोमोडोर डेविड एलफोर्ड यांनी मुख्य अतिथी म्हणून बोलाविले बद्दल आभार व्यक्त केले आणि ब्रिटिश नेव्ही चा केवळ संरक्षणच नव्हे परंतु सामाजिक बांधिलकी आणि सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे असे सांगितले.

बीव्हिजी ग्रुपचे श्री हणमंतराव गायकवाड यांनी एकीचे बळ आणि परदेशात स्तिथ झालेल्या लोकांनी भारतात कशी मदत करू शकतात याच्यावर प्रेक्षकांना टिप्स दिल्या. त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल आणि अभूतपूर्व भाषणाबद्दल त्यांना उभे राहून मानवंदना देण्यात आली.

श्री सौरभ गाडगीळ यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले आणि PNG  हे १८३२ साली सुरुवात झाली आणि महाराष्ट्र मंडळ लंडन याची १९३२ साले स्थापन झाल्याची लोकांना आठवण करून दिली.

श्री राजेश खानविलकर यांनी रिअल इस्टेट मध्ये घेण्यात येणाऱ्या २% कमिशन कसे बंद केले असे सांगितले. LMSला खालील व्यक्तींचा त्यांनी केलेल्या अभूतपूर्व समाजसेवेबद्दल, आणि आपआपल्या क्षेत्रात दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल सन्मान केला:
रांका ज्वेलर्स चे श्री फतेहचंद रांका यांना "एक्सलेन्स अचिव्हमेंट इन बिझनेस आणि सोशल पुरस्कार"
PNG ज्वेलर्स चे श्री सौरभ गाडगीळ यांना "महाराष्ट्रीयन यूथ आंतरप्रेन्युर आयकॉन पुरस्कार"
बडवे इंजिनीरिंग लिमिटेड चे श्री श्रीकांत बडवे यांना "ऑटोमोटिव्ह इंजिनीरिंग एक्सलेन्स LMS पुरस्कार " आणि
R.K"s  होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सी चे श्री राजेश खानविलकर यांना "रियल इस्टेट जगतातील स्पेशल इनोवेटिव्ह पुरस्कार" देण्यात आले

लंडन मराठी संमेलनात दिमाखदार फॅशन शो
लंडन मराठी संमेलनात फॅशन शो करण्यात आला ज्याच्या मध्ये २० लोकल मॉडेल्स ने भाग घेतला होता. डॉ महादेव भिडेंच्या प्रेरणेने आणि प्रियांका कानविंदे, साईश शेटे, सौरभ वळसंकर यांच्या अथक परिश्रमाने हा फॅशन शो अगदी थाटा माटात पार पडला. याच्यात भाग घेणारे कलाकार होते :
कोरिओग्राफर - प्रियांका कानविंदे, सईश शेटे
आयोजक झ्र डॉ. महादेव भिडे आणि सौरभ वळसंकर
ध्वनी सहाय्य : मिलिंद देशमुख
मॉडेल : डॉ. अर्चना तापुरीया, विहंग इंगळे, योगेश चौधरी, शर्वरी चिडगुपकर, नवनीत रविशंकर, दीपा सराफ देशपांडे, सचिन देशपांडे, प्रियांका दवे, तन्वी वाईंगणकर, गायत्री सोनावणे, सौरभ सोनावणे, दिना सेला, मीनाक्षी परांजपे, भावना लोटलीकर, रश्मी लखपते तेली, विशाल तेली, लुलजेता गोका, निका खळदकर

मायबोलीचे पुढच्या पिढीसाठी महत्त्व
भारतीय भाषा संघाचे दिलीप पेडणेकर, संतोष पारकर आणि पंकज अंधारे यांनी येणाऱ्या पिढीला मराठी शिकवण्याचे महत्व एका छोट्या नाट्यछटेने दाखविले ज्याच्यात लहान मुलांनी अगदी सहजपणे क, ख, ग, घ, न अशी सर्व बाराखडी अगदी व्यवस्थित पणे म्हणून दाखविली.
राहुल औरंगाबादकरने आपल्या स्क्रिप्ट ने व निवेदिता,
ज्योती व खास करून सर्व मुलांनी प्रयोगाला शोभा आणली.

लंडनवासीयांची कलाकारांच्या
कला-गुणांना मनापासून दाद
अभिनेत्री भार्गवी, नुपूर धैठणकर, स्मिता साळुंके व मानसी महाजन यांनी बहारदार नृत्य सादर केले. गायक हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमाप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. कला-गुणांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत नृत्याचा आनंद लुटला. समिर चौगुले यांच्या "कॉमेडीची एक्सप्रेस ट्रेन" या कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.

मुख्य समिती
सुशील रापतवार (आवाहक), वैशाली मंत्री (उप आवाहक), डॉ गोविंद काणेगावकर, डॉ महादेव भिडे, अनिल नेने, डॉ उत्तम शिराळकर, शार्दुल कुलकर्णी, आदित्य काशीकर, प्रणोती पाटील जाधव

लंडन मराठी संमेलनाचे शिलेदार
लंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) चे शिलेदार ज्यांनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आणि संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने खालील सहकाऱ्यांची नावे आवर्जून घेतली पाहिजे: अर्निका परांजपे (अटकेपार - स्मरणिका संपादिका),निखिल देशपांडे, अजिंक्य भावे, विजेंद्र इंगळे, सचिन पाटील, मोहनजी दामले, अंजली शेगुणशी, निका वळसनकर, मयूर चांदेकर, अद्वैत जोशी,चेतन मंत्री, सौरभ वळसनकर, चेतन हरफळे, अरुणा देशमुख, शिव देशमुख, श्री मोकाशी, रेणुका खेडकर, दिलीप आमडेकर, माधवी आमडेकर, नितीन खेडकर, केदार लेले, निवेदिता सुकळीकर, संतोष पारकर, अभिजित देशपांडे, हर्षवर्धन सोमण, मिलिंद देशमुख

प्रायोजक
लंडन मराठी संमेलनाचे मुख्य प्रायोजक होते भारत विकास ग्रुप, स्टेट बँक ऑफ इंडिया, लोढा ग्रुप, पितांबरी, श्री दीपलक्ष्मी,वेस्टबरी आणि लॉरबीस तसेच ट्रॅव्हल पार्टनर - मँगो हॉलिडेस
केटरिंग पार्टनर - रोशनीस फाईन डायनिंग
ट्रॉफीस - नीलांजन आर्टस् पुणे
संमेलन डेकोरेशन - रजनीकांत सेल्स सतारा
या संमेलनाला ४०० शे होऊन अधिक लोकं उपस्तिथ होती. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या अभूतपूर्व सोहोळ्याचं कौतुक केलं हे विशेष!

 

Web Title: London Marathi Conference: Local Jhunka Global Daga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.