लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा

By admin | Published: June 23, 2017 04:25 PM2017-06-23T16:25:47+5:302017-06-23T16:28:44+5:30

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला

London Marathi Convention 2017 celebrates | लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा

लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा

Next
>केदार लेले / ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला. यात "महाराष्ट्र मंडळ लंडन" च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे विशेष आभार मानण्यात आले.
 
महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त, लंडन मराठी संमेलन २०१७ आजोजित करण्यात आले होते. लंडन मराठी संमेलन (एलएमएस २०१७) ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली ज्याच्यात १५० होऊन अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते.
 
शुक्रवारी (दि. 2 जून रोजी), १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, येथे "एलएमएस"ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली. उद्योजक सोहळ्याचे आयोजन दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी प्रशस्थ अशा १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, लंडन येथे घडवून आणले.
 
जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आणि पुरस्कार 
या परिषदेत जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यात खालील उद्योजकांना पारितोषिके देण्यात आली:
एस्टॅब्लिश श्रेणी - गोल्ड पारितोषिक विजेते: श्री उमेश दाशरथी, सिल्वर: श्री संजीव नाबर, ब्रॉन्झ: श्रीकृष्ण गांगुर्डे, श्री अमरेंद्र कुलकर्णी आणि स्टार्ट-उप श्रेणीमध्ये - गोल्ड: श्री रोहन आणि श्री प्रियल नागरे, सिल्वर: विलास शिंदे, ब्रॉन्झ: श्री प्रसाद भिडे. ह्या स्पर्धेत १०० होऊन अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता आणि जजींग पॅनल वर होते: श्री शंतनू भडकमकर, श्रीराम दांडेकर, श्री चंद्रशेखर वझे, डॉ नितीन देसाई आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई.
 
लंडनवासीयांची कलाकारांच्या कला-गुणांना मनापासून दाद
आपली कला सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 
अभिनेत्री भार्गवी, नुपूर धैठणकर, स्मिता साळुंके व मानसी महाजन यांनी बहारदार नृत्य सादर केले. गायक हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमाप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड यांची भूमिका असलेल्या ‘हया गोजिरवाण्या घरात’ ह्या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला. तसेच प्रतापजी पवार यांनी कत्थक सादर केले आणि त्यांच्या क्षेत्रात त्यांनी दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल त्यांचा सन्मान केला गेला
कला-गुणांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत नृत्याचा आनंद लुटला. समिर चौगुले आणि प्राजक्ता हनमघर यांच्या "बुलेट एक्सप्रेस" या कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.
या संमेलनाला ४०० शे होऊन अधिक लोकं उपस्थित होते. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या अभूतपूर्व सोहोळ्याचं कौतुक केलं हे विशेष!
 
लंडन मराठी संमेलन २०१७ - मुख्य समिती
सुशील रापतवार (आवाहक), वैशाली मंत्री (उप आवाहक), डॉ गोविंद काणेगावकर, डॉ महादेव भिडे, अनिल नेने, डॉ उत्तम शिराळकर, शार्दुल कुळकर्णी, आदित्य काशीकर, प्रणोती पाटील जाधव
 
लंडन मराठी संमेलन २०१७ चे शिलेदार
लंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) चे शिलेदार ज्यांनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आणि संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने खालील सहकाऱ्यांची नावे आवर्जून घेतली पाहिजे: अर्निका परांजपे (अटकेपार - स्मरणिका संपादिका), निखिल देशपांडे, अजिंक्य भावे, विजेंद्र इंगळे, अंजली शेगुणशी, निका वळसनकर, मयूर चांदेकर, अद्वैत जोशी,चेतन मंत्री, सौरभ वळसनकर, चेतन हरफळे, अरुणा देशमुख, निवेदिता सुकळीकर, संतोष पारकर, अभिजित देशपांडे, हर्षवर्धन सोमण, मिलिंद देशमुख
 

Web Title: London Marathi Convention 2017 celebrates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.