लंडन टू न्यूयॉर्क.. अवघ्या ११ मिनिटांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2016 03:41 PM2016-01-29T15:41:28+5:302016-01-29T15:53:55+5:30
इंडस्ट्रीयल डिझायनर चार्ल्स बम्बार्डिअर यांनी 'अँटिपोड' नावाच्या या एक नवे हायपरसोनिक जेट आणले त्याद्वारे लंडन-न्यूयॉर्क प्रवास अवघ्या ११ मिनिटांत करता येईल.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - इंडस्ट्रीयल डिझायनर चार्ल्स बम्बार्डिअर यांनी 'अँटिपोड' नावाच्या या एक नवे हायपरसोनिक जेट आणले असून त्याद्वारे लंडन-न्यूयॉर्क दरम्यानचे ५५६६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ११ मिनिटांत पार करता येईल असा दावा त्यांनी केला आहे. बम्बार्डिअर इंक या कॅनेडिअन कंपनीशी संलग्न असलेल्या चार्ल्स यांच्या सांगण्यानुसार हे जेट २० प्रवाशांसह २० हजार किमीपर्यंतचे अंतर तासाभराच्या आत कापू शकतं. याची किंमत सुमारे १५० मिलियन डॉलर इतकी असेल.
ही आहेत हायपरसोनिक जेटची वैशिष्ट्ये :
- या जेटचा वेग सुपरसॉनिक स्क्रीमर एअरक्राफ्टपेक्षा दुप्पट तर कॉनकॉर्डपेक्षा १२ पट अधिक आहे.
- या हायपरसोनिक जेटचे पंख रॉकेट बूस्टरसोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे हे जेट ४० हजार फूट उंचीवर उडू शकेल.
- हे जेट २० हजार किमीपर्यंतचे अंतर एका तासाच्या आत पार करू शकते.
- या जेटमध्ये स्क्रॅमजेट इंजिन बसवण्यात येणार आहे.
- विशेष म्हणजे ल्युनॅटिक कॉन्सेप्ट्स या भारतातील डिझाईन लॅबचे संस्थापक अभिषेक रॉय यांनी 'अँटिपोड'चे डिझाईन बनवले आहे.