लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू

By admin | Published: June 4, 2017 03:20 AM2017-06-04T03:20:19+5:302017-06-04T10:44:30+5:30

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

London terror attack on three places, six deaths | लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू

लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 04 -ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.   येथील लंडन ब्रीजवरुन चालणा-या पादचा-यांना एका व्हॅन चालकाने उडविले यामध्ये वृत्त अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चालू हल्ला केल्याने परिसरात खळबऴ माजली आहे. त्यामुळे एकंदरीत हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविली जात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू तर जवळपास 20 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी ठार केले आहे," अशी माहिती मार्क रोले या ब्रिटनच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्रसिद्ध असलेल्या लंडन ब्रीजवर एका व्हॅन चालकाने पादचा-यांना चिरडल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसर लॉक डाऊन केला आहे. व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लंडन ब्रीजवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. या भागातील बसचे मार्गही बदलण्यात आले असून लंडनमधील भुयारी रेल्वे स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. या घटनेत अनेक पादचारी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे लंडन ब्रीजजवळच असलेल्या प्रसिद्ध बॉरो मार्केटमधील एका रेस्टॉरन्टमध्ये असलेल्या लोकांवर एका व्यक्तीने चाकू हल्ला आणि गोळीबार केल्याची घटना सुद्धा याचवेळी घडली. या घटनेतही अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, वॉक्सहॉल परिसरात सुद्धा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.  
दरम्यान, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाच्या अधिका-यांची आपत्कालीन बैठक बोलाविली असून त्यांनीही हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले आहे. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी सुद्धा या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन इंग्लंडला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. याचबरोबर, या घटनेचा अनेक एजन्सीकडून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे लंडन ब्रीजच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे ट्विट लंडन अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसने केले आहे.
याआधी ब्रिटनमधील पार्लमेंट परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू आणि 50 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी  इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. 
 

Web Title: London terror attack on three places, six deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.