जगातील सर्वात लांब सागरी सेतू चीनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:39 AM2018-10-21T04:39:26+5:302018-10-21T04:39:51+5:30
चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल तयार झाला असून, तो २४ आॅक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
बीजिंग : चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल तयार झाला असून, तो २४ आॅक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
चीनच्या शिन्हुआ सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा पूल ५५ कि.मी. लांबीचा असून, त्याचे काम डिसेंबर २००९ मध्ये सुरू झाले होते.
अब्जावधी डॉलर खर्च करून बांधलेल्या या पुलामुळे हाँगकाँग व झुहाई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांऐवजी अवघ्या ३० मिनिटांत करता येईल जेणेकरून पर्ल खोऱ्यातील ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ येतील. (वृत्तसंस्था)