लिट्टेने घेतलेले दागिने महिंदा राजपाक्षेंनी केले परत
By admin | Published: December 6, 2014 12:07 AM2014-12-06T00:07:28+5:302014-12-06T00:07:28+5:30
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी व्यक्तिश: उत्तरेतील नागरिकांना त्यांचे सोने आणि दागिने परत केले. लिट्टेने आपल्या समांतर प्रशासनाच्या काळात कथितरीत्या हे दागिने घेतले होते.
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी व्यक्तिश: उत्तरेतील नागरिकांना त्यांचे सोने आणि दागिने परत केले. लिट्टेने आपल्या समांतर प्रशासनाच्या काळात कथितरीत्या हे दागिने घेतले होते.
पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी तामिळ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा राजपाक्षेंचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
समांतर सरकारच्या काळात उत्तरेतील नागरिकांकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यात आल्या होत्या किंवा लिट्टेच्या समांतर बँकेत जमा होत्या. या सर्व नागरिकांना गुरुवारी राजपाक्षेंच्या सरकारी कार्यालयात बोलावून घेऊन या चिजवस्तू त्यांना परत करण्यात आल्या.
राजपाक्षे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मी त्यांना सोन्याहून अधिक किमती वस्तू दिली आहे. मी त्यांना स्वातंत्र्य (लिट्टेपासून मुक्ती) दिले आहे. (वृत्तसंस्था)