नशीबवान! ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालं लॉटरीचं तिकीट; स्क्रॅच करताच महिला झाली कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:09 PM2022-12-26T15:09:48+5:302022-12-26T15:10:55+5:30

महिलेच्या ऑफिसमध्ये सणासुदीच्या काळात लॉटरीच्या तिकीटाच्या देवाणघेवाणीचा खेळ सुरू होता. ज्यामध्ये तिला दोन तिकिटं मिळाली. पण भेट म्हणून मिळालेलं हे तिकीट तिचं आयुष्य बदलून टाकेल, असं तिला अजिबात वाटलं नव्हतं.

lottery ticket received as gift in the office womans luck opened as soon as she scratched and won crores | नशीबवान! ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालं लॉटरीचं तिकीट; स्क्रॅच करताच महिला झाली कोट्यधीश

नशीबवान! ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालं लॉटरीचं तिकीट; स्क्रॅच करताच महिला झाली कोट्यधीश

googlenewsNext

नशीब चांगलं असेल तर कधीही काहीही होऊ शकतं. एखाद्या खेळात माणूस करोडपतीसुद्धा होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. या महिलेच्या ऑफिसमध्ये सणासुदीच्या काळात लॉटरीच्या तिकीटाच्या देवाणघेवाणीचा खेळ सुरू होता. ज्यामध्ये तिला दोन तिकिटं मिळाली. पण भेट म्हणून मिळालेलं हे तिकीट तिचं आयुष्य बदलून टाकेल, असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. मात्र, जेव्हा इतर सहकाऱ्यांप्रमाणे संबंधित महिलेनेही तिच्याकडे असणारं तिकीट स्क्रॅच केलं, तेव्हा तिचा स्वत:वर विश्वास बसेना. कारण ती एका क्षणात करोडपती झाली होती.

लॉटरी लागल्याने करोडपती झालेल्या या महिलेचं नाव लॉरी जेन्स असं असून, ती अमेरिकेतील केंटकी येथे राहते. लॉरीला ऑफिसमध्ये भेट म्हणून लॉटरीचं तिकीट मिळालं व हे तिकीट स्क्रॅच करताच तिने तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकलं. या एका तिकीटाने तिचं आयुष्यच बदललं. या प्रकारानं लॉरीला स्वतःचा नशिबावर विश्वास बसत नव्हता. आनंदाची एवढी मोठी गोष्ट तिने स्वतःच्या पतीला सांगताच तोही आश्चर्यचकित झाला.

लॉरी जेन्स एका डेंटल सेंटरमध्ये ऑफिस मॅनेजर म्हणून काम करते. तिच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक गेम खेळला जात होता. हा गेम खेळण्यासाठी लॉरीला 2000 रुपये किंमतीचं एक लॉटरीचं तिकीट देण्यात आलं. मात्र ऑफिसमध्येच तिचं तिकीट कुणीतरी चोरलं. त्यामुळे तिला ऑफिसने आणखी दोन तिकिटं दिली. जेव्हा लॉरीने मिळालेलं केंटकी लॉटरीचं तिकीट स्क्रॅच केलं, तेव्हा तिने 1.5 कोटीची बक्षीस रक्कम जिंकली. त्यानंतर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

लॉरी म्हणाली, "13 डिसेंबर 2022 रोजी ऑफिसमध्ये 'व्हाइट एलिफंट गिफ्ट एक्सचेंज' गेमचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात मला मिळालेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे मी मोठं बक्षीस जिंकले. या बक्षिसाची किंमत दीड कोटी डॉलर्स होती. टॅक्स कपात करूनही मला 1 कोटी 3 लाख डॉलर्स मिळाले आहेत. लॉटरी जिंकल्याच्या आनंदात मी पहिल्यांदा माझ्या पतीला फोन केला. पण एवढ्या मोठ्या रकमेबद्दल पतीला सांगताच त्याचा विश्वास बसेना. ही रक्कम मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: lottery ticket received as gift in the office womans luck opened as soon as she scratched and won crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.