Love Story: मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:32 PM2022-06-11T16:32:42+5:302022-06-11T16:33:06+5:30
Love Story: एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत.
वॉशिंग्टन - एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत. तसेच हा काळ फार आनंददायी असल्याचे या दोघांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील जॅक्शन लेक येथील राहणाऱ्या २५ वर्षीय सुजान डियाज २०१८ मध्ये एका पार्टटाइम जॉबच्या शोधात होती. तेव्हा ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती. तसेच अतिरिक्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात होती. याचदरम्यान, सुजाना हिला एका स्थानिक हॉटेलमध्ये असलेल्या नोकरीबाबत माहिती मिळाली.
सुजाना ही त्या रेस्टॉरंटमध्ये गेली आणि जवळच्या बूथमध्ये बसून नोकरीसाठी अर्ज लिहित होती. त्याचवेळी कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने वळून पाहिले तर ते त्या रेस्टॉरंटचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर टोनी कहानेक हे होते. ते तिथे सुजाना हिची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले होते.
या भेटीतील चर्चेवेळी दोघांनाही एकमेकांविषयी सुप्त आकर्षण वागले. त्यामुळे टोनी यांनी सुजानाकडे तिचा फोन नंबर मागितला. दुसऱ्या दिवशी सुजाना हिला टोनी यांचा एक मेसेज मिळाला. त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. काहि दिवसांनंतर ते दोघेही डिनरवर गेले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी हे नातं गुप्त ठेवलं. मात्र काही काळानंतर टोनी यांनी सुजान हिला आपल्यासोबत शिफ्ट होण्यास सांगितलं. तेव्हा आता या नात्याबाबत पालकांना सांगावं लागेल, याची जाणीव सुजान हिला झाली. सुरुवातीला तिच्या पालकांचा यावर विश्वास बसला नाही. मात्र मुलीच्या आनंदाचा विचार करत त्यांनी टोनी यांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवले. टोनी यांच्या आईनेही या नात्याला मान्यता दिली.
मात्र टोनी आणि सुजाना यांचे काही मित्र मात्र या नात्याबाबत तितकेसे खूश नव्हते. सुजान हिने सांगितले की, आपल्या वयाच्या पार्टनरसोबत राहण्यापेक्षा कुठल्याही मॅच्युअर व्यक्तीसोबत नात्यात राहणं चांगलं.
आता या नात्याला तीन वर्षे झाली आहेत. तसेच सुजान आणि टोनी एकमेसांसोबत घालवलेला तीन वर्षांचा काळ हा सर्वात आनंददायी असल्याचे सांगतात.