शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये महिलांचा कमी सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 01:41 AM2020-11-01T01:41:49+5:302020-11-01T01:42:19+5:30
united nations : नगकुका यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले की, १९९२ ते २०१९ या कालावधीत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये विशेष दूत, मध्यस्थ म्हणून काम पाहिलेल्यांमध्ये व शांतता करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे अवघे तेरा व सहा टक्के होते.
संयुक्त राष्ट्रे : शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत पुरुषांइतकाच महिलांचाही समान सहभाग असावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात संमत होऊन २० वर्षे लोटली. मात्र त्याबाबत महिलांना समान न्याय कधीच मिळाला नाही अशी खंत संयुक्त राष्ट्रांच्या महिला सबलीकरण विभागाच्या कार्यकारी संचालक फुम्झिल म्लाम्बो नगकुका यांनी व्यक्त केली आहे.
नगकुका यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले की, १९९२ ते २०१९ या कालावधीत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये विशेष दूत, मध्यस्थ म्हणून काम पाहिलेल्यांमध्ये व शांतता करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे अवघे तेरा व सहा टक्के होते. त्या म्हणाल्या की, शांतता प्रस्थापित करण्याच्या काही प्रयत्नांना चांगली फळे आली. मात्र तशा प्रकारच्या अन्य प्रयत्नांमध्ये हिंसाचार करणाऱ्यांनाच अधिक बळ प्राप्त झाल्याचे दिसले.