लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
By admin | Published: August 30, 2016 04:18 AM2016-08-30T04:18:41+5:302016-08-30T04:18:41+5:30
श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ देशासाठी सशस्त्र संघर्ष केलेला आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ ईलमचा (लिट्टे) नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असू शकतो, असे काही तमिळ राष्ट्रवादींचे म्हणणे आहे.
Next
कोलंबो : श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ देशासाठी सशस्त्र संघर्ष केलेला आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ ईलमचा (लिट्टे) नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असू शकतो, असे काही तमिळ राष्ट्रवादींचे म्हणणे आहे.
बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयाला (ओएमपी) प्रभाकरनचे नाव कळविले जाऊ शकते. उत्तर प्रांतिक परिषदेचे सदस्य एम. शिवाजीलिंगम यांनी स्थानिक रेडिओ केंद्राला सांगितले की, प्रभाकरनची बहीण व भाऊ यांची इच्छा असेल तर मी ओएमपीला प्रभाकरनचे नाव द्यायला तयार आहे. प्रभाकरन २००९ मध्ये १९ मे रोजी श्रीलंकेच्या लष्कराकडून ठार मारला गेला, असे सरकारने जाहीर केले होते.