शक्तिशाली सौरवादळांमुळे चंद्रावरील मातीचे बाष्पीभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 01:33 AM2017-01-09T01:33:36+5:302017-01-09T01:33:36+5:30
अत्यंत शक्तीशाली सौर वादळांमुळे चंद्राच्या पोल्सनजीकच्या शांत आणि कायमच्या झाकल्या गेलेल्या भागांतील पृष्ठभाग जागृत होऊन त्यातून ‘ठिणगी’ निर्माण होण्याची शक्यता आहे
वॉशिंग्टन : अत्यंत शक्तीशाली सौर वादळांमुळे चंद्राच्या पोल्सनजीकच्या शांत आणि कायमच्या झाकल्या गेलेल्या भागांतील पृष्ठभाग जागृत होऊन त्यातून ‘ठिणगी’ निर्माण होण्याची शक्यता आहे व त्यामुळे चंद्राच्या मातीचे बाष्पीभवन किंवा ती वितळू शकेल, असे ‘नासा’ने केलेल्या ताज्या अभ्यासात उघड झाले आहे. या भागांतील भविष्यातील नमुन्यांचे विश्लेषण जेव्हा केले जाईल त्यावेळी हे बदल कदाचित उघड होतील. चंद्र आणि सौरमालेचा इतिहास समजून घेण्यासाठी या नमुन्यांचे विश्लेषण महत्वाचे ठरतील. चंद्रावर बहुत करून वातावरणच नाही त्यामुळे त्याचा पृष्ठभाग कठोर अशा अंतराळ वातावरणात उघड झाले आहे. छोट्या उल्कापाताच्या परिणामी चंद्रावरील धूळ आणि खडकाचा सगळ््यात वरचा भाग सतत घुसळून निघतो आहे. या पृष्ठभागापैकी १० टक्के भागाचे उल्कापाताच्या परिणामामुळे बाष्पीभवन किंवा तो वितळून गेला आहे, असे अमेरिकेतील युनिव्हरसिटी आॅफ न्यू हॅम्पशायरचे अँन्ड्र्यू जॉर्डन यांनी सांगितले.