९0 वर्षांच्या लंगफिश माशाचे निधन
By admin | Published: March 13, 2017 12:37 AM2017-03-13T00:37:21+5:302017-03-13T00:37:21+5:30
ग्रँडडॅड या नावाचा लंगफिश हा अॅक्वारियममधील जगातील सर्वात जास्त आयुष्य लाभलेला मासा मानला गेला होता. अवयव निकामी झाल्यामुळे त्याचे नुकतेच निधन झाले आहे.
Next
ग्रँडडॅड या नावाचा लंगफिश हा अॅक्वारियममधील जगातील सर्वात जास्त आयुष्य लाभलेला मासा मानला गेला होता. अवयव निकामी झाल्यामुळे त्याचे नुकतेच निधन झाले आहे. शिकागोतील शेड्ड अॅक्वारियममध्ये असलेल्या या माशाचे वय ९० वर्षे होते. अवयव निकामी झाल्यामुळे खाण्यातील त्याचा उत्साह कमी झाल्यावर त्याला दयामरण
दिले गेले. ग्रँडडॅडचे वजन ११ किलो (२४ पौंड) होते व त्याला तो त्याचा मूळचा देश आॅस्ट्रेलियातून शिकागोमध्ये १९३३ मध्ये आल्यापासून १०० दशलक्षापेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते. लंगफिश हे १०० पेक्षा जास्त वर्षे जगतात. आॅस्ट्रेलियामध्ये या माशांची जात संरक्षित आहे.