थाई राजकुमारींच्या कंबोडिया दौऱ्यासाठी लक्झरी टॉयलेट
By admin | Published: February 23, 2016 01:37 AM2016-02-23T01:37:56+5:302016-02-23T01:37:56+5:30
थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सीरिनधोरन या कंबोडियात तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, रतनाक्किरी प्रांतात याक लोम या पर्यटनस्थळी त्या मुक्कामी
नाम पेन्ह (कंबोडिया) : थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सीरिनधोरन या कंबोडियात तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, रतनाक्किरी प्रांतात याक लोम या पर्यटनस्थळी त्या मुक्कामी राहणार असून त्यांच्यासाठी ४० हजार डॉलर खर्च करून लक्झरी टॉयलेट बांधण्यात येत आहे. अर्थात राजकुमारींचा दौरा संपताच हे टॉयलेट नष्टही करण्यात येणार आहे.
ज्या भागात राजकुमारी दौरा करणार आहेत त्या भागात अतिशय गरीब लोक राहतात. राजकुमारी महाचक्री यांच्या निवासासाठी एक झोपडीवजा घर बांधण्यात येत असून हे घरही वातानुकूलित आहे.
दरम्यान, एससीजी कंपनीला या टॉयलेटच्या बांधकामाचे काम देण्यात आले आहे. या ठिकाणी राजकुमारी एक दिवस मुक्काम करणार आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बांधकामासाठी थेट बँकॉकहून कच्चा माल मागविण्यात आला आहे.