मादागास्करचा 'ब्लॅक डेथ' शेजारील देशांमध्ये पसरण्याचा धोका ; प्लेगचे 124 बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 04:04 PM2017-10-30T16:04:13+5:302017-10-30T16:22:21+5:30
मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. त्याचप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवेश करण्याची भीती निर्माण झाली आहे.
अॅंटानानारिवो- मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. चप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवेश करण्याची भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा प्लेग आता केनया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक,टांझानिया, मॉरिशस, ला रियुनियन, सेशेल्स आणि कोमोरोस येथे पसरण्याची भीती व्यक्त केली आहे.
प्लेगचे प्रकार आणि त्यापासून होणारा धोका-
प्लेगचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे ब्युबॉनिक प्लेग. यामध्ये प्लेगचे जंतू किडे, किटकांच्या मार्फत प्रवास करतात आणि किडा मनुष्याला चावल्यानंतर त्या जंतूंचा मनुष्याच्या रक्तात प्रवेश होतो. त्यानंतर ही लागण वाढल्यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये प्लेगचे रुपांतर न्युमॉनिक प्लेगमध्ये रुपांतर होते. त्यामुळे त्याच्या खोकल्यातून ते जंतू बाहेर पडून त्याची लागण इतरांना होते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्पेशीकॅमिक प्लेग. हा प्लेग दुषित रक्ताच्या संक्रमणामुळे पसरतो. प्लेग झालेल्या व्यक्तीच्या अंगावर लसिका गाठी ( रक्तपेशी तसेच पातळ द्रवाच्या गाठी) तयार होतात. तसेच अत्यंत अशक्तपणा, ताप, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात. अंगावरील गाठी फुटल्यामुळे जखमा होणे, पस होणे असेही प्रकार दिसून येतात.
#Plague: Nothing to see here – #BlackDeath never really left us By KRISTEN VAN SCHIE @kristenvanschiehttps://t.co/QTZUJrjnShpic.twitter.com/NL5ZzJFF6l
— Daily Maverick (@dailymaverick) October 30, 2017
मादागास्करच्या प्लेगचा इतिहास-
28 ऑगस्ट रोजी मोरामंगा येथे या साथीतील पहिला मृत्यू नोंदवण्यात आला त्यानंतर प्लेगला बळी पडणा-या लोकांची संख्या वाढतच गेली. वास्तविक मादागास्कर बेटावर प्लेग हा रोग नवा नाही. दरवर्षी मादागास्करमध्ये प्लेगची 400 लोकांना लागण झालेले दिसून येते. मात्र ते सगळे ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण असतात, आता आलेली साथ ही न्युमॉनिक प्लेगची असून ती जास्त धोकादायक आहे. ही साथ पूर्व मादागास्कर आणि अँटनानारिवो प्रांतांमध्ये पसरलेली आहे.
प्लेग जगातून नाहीसा झाला असे वाटत असतानाच आजही आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत प्लेगच्या साथी डोके वर काढत असतात. मादागास्करमध्ये भारतीय जहाजांतून 1898 साली प्लेग गेल्याचे सांगण्यात येते. प्लेगचे संक्रमण रोखण्यासाठी मादागास्करने चांगले प्रयत्न केले असले तरी 2004-2009 या काळात जगातील प्लेगबाधितांपैकी 30% रुग्ण मादागास्करमध्ये होते, असे एका निरीक्षणातून नोंदले गेले आहे.
मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू
मादागास्करमधील अंत्यसंस्काराची पद्धत प्लेगचा प्रसार वेगाने करु शकते-
मादागास्करमधील मालागासी जमातीमध्ये मेलेल्या व्यक्तीला कापडामध्ये गुंडाळून, खांद्यावर नाचवत अंत्यसंस्कारासाठी नेले जाते. यामध्ये आबालवृद्ध, महिला नृत्यही करतात. या प्रथेला फमादिहाना असे म्हटले जाते. पण प्लेगने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या आसपास प्लेगचे जंतू बराच काळ राहू शकतात. शेकडो लोकांनी अशाप्रकारे अंत्यसंस्कार केल्यास प्लेग अधिक वेगाने पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
WHO supports the gov of #Madagascar in response to #plague outbreak
— Majid Althaqafy (@Althaqafym) October 27, 2017
This sacred ritual could be spreading the plague pic.twitter.com/BPqZBNQHyZ
भारतातला प्लेग-
जगभरात प्लेगने आजवर अनेक देशांमध्ये थैमान घातले होते. भारतही प्लेगच्या तावडीतून सुटलेला नाही. 19 व्या शतकाच्या मध्यापासून चीनमध्ये प्लेगने हजारो लोकांचे प्राण घेतले होतेच. 1896 साली भारतामध्ये प्लेगचा प्रवेश झाला. 1894 साली हॉंगकॉंगमध्ये प्लेगचा उद्रेक झाला होता. तेथूनच हा प्लेग भारतात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पुढील 30 वर्षांमध्ये सव्वा कोटी लोकांचे प्राण या रोगाने घेतल्याचे सांगण्यात येते. मुंबई, पुणे, कोलकाता, कराची (आता पाकिस्तानात) अशा मोठ्या शहरांमध्ये प्लेगची साथ झपाट्याने पसरली. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी अत्यंत कठोर पद्धतींचा वापर केला आणि त्याच्या नावाखाली लोकांवर अत्याचार सुरु केले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी वॉल्टर चार्ल्स रॅंडला गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली.
WHO has delivered 1.3 million doses of antibiotics & other supplies to prevent & treat #plague in #Madagascarpic.twitter.com/uqGafdMfWn
— WHO (@WHO) October 23, 2017