आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवून मोठी चूक केली; धोके सांगण्यासाठी 'AI'च्या गॉडफादरनं सोडली गुगलची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:33 PM2023-05-02T20:33:13+5:302023-05-02T20:37:33+5:30

हिंटन यांनी एआयच्या 'धोक्यां'संदर्भात माहिती देण्यासाठीच आपली नोकरी सोडली आहे. महत्वाचे म्हणजे, AI विकसित करण्यात हिंटन यांनीही मदत केली होती. 

Made a big mistake by making artificial intelligence The AI godfather quit his job at Google to tell about the dangers | आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवून मोठी चूक केली; धोके सांगण्यासाठी 'AI'च्या गॉडफादरनं सोडली गुगलची नोकरी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवून मोठी चूक केली; धोके सांगण्यासाठी 'AI'च्या गॉडफादरनं सोडली गुगलची नोकरी

googlenewsNext

वॉशिंग्टन - जगभरात एआयची भूमिका जस-जशी वाढू लागली आहे, तस-तसे त्याचे धोकेही समोर येऊ लागले आहेत आणि तज्ज्ञ मंडळींनीही यासंदर्भात उघडपणे बोलायलाही सुरुवात केली आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)'चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन (Geoffrey Hinton) यांनी गेल्या आठवड्यात गुगलचा राजीनामा दिला. यासंदर्भात त्यांनी स्वतःच पुष्टी केली आहे. हिंटन यांनी एआयच्या 'धोक्यां'संदर्भात माहिती देण्यासाठीच आपली नोकरी सोडली आहे. महत्वाचे म्हणजे, AI विकसित करण्यात हिंटन यांनीही मदत केली होती. 

न्यूयॉर्क टाइम्ससोबत बोलताना, आपल्या गूगलच्या राजीनाम्याची घोषणा करताना हिंटन म्हणाले, मला आता माझ्या कामावर पश्चाताप होत आहे.' हिंटन यांनी ट्विट केले की, AI च्या धोक्यांसंदर्भात उघडपणे बोलण्यासाठी आपण गुगलची नोकरी सोडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, 'मला AI च्या धोक्यासंदर्भात बोलता यावे आणि याचा गूगलवरही काही परिणाम होऊ नये, म्हणून मी नोकरी सोडली आहे. गूगलने फार जबाबदारीने काम घेतले आहे.'

'अता मी उघडपणे बोलू शकतो -
नुकतेच बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना हिंटन म्हणाले, 'आता मी मला दिसणाऱ्या याच्या दोक्यांसंदर्भात उघडपणे बोलू शकतो. कारण यांपैकी काही धोके अत्यंत भयभीत करणारे आहे.' ते म्हणाले, 'सध्या तरी मी सांगू शकतो की, ते आपल्या पेक्षा अधिक बुद्धिमान नाहीत. पण मला वाटते की, ते लवकरच होऊ शकतात.' हिंटन यांनी एका दशकाहून अधिक काळ गुगलसाठी काम केले आहे आणि या क्षेत्रात सर्वाधिक आदराच्या आवाजांपैकी एक होते. 2012मध्ये टोरंटो येथे दो ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसोबत काम करताना त्यांना एआयमध्ये मुख्य यश मिळाले होते. 

Web Title: Made a big mistake by making artificial intelligence The AI godfather quit his job at Google to tell about the dangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.