युकेत गुजराती ट्रेची जादू, तब्बल ९ लाख ६२ पाऊंड्समध्ये झाला लिलाव
By admin | Published: October 8, 2015 12:27 PM2015-10-08T12:27:51+5:302015-10-08T12:27:51+5:30
गुजरातमधील १६ व्या दशकातील लाकडी ट्रे युरोपला चांगलाच भावला असून या ट्रेचा तब्बल ९, ६२, ५०० पाऊंड्सला लिलाव झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ८ - गुजरातमधील १६ व्या दशकातील लाकडी ट्रे युरोपला चांगलाच भावला असून या ट्रेचा तब्बल ९, ६२, ५०० पाऊंड्सला लिलाव झाला आहे. या प्रकारातील दुर्मिळ वस्तूवर लागलेली सर्वात महागडी बोली आहे.
लंडनमधील इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेल सुरु असून यामध्ये गुजरातमधील १६ व्या दशकातील ट्रेचा लिलाव झाला. मोत्यांची सजावट असलेल्या या ट्रेसाठी ६० ते ७० हजार पाऊंड्सएवढी किंमत ठरवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष लिलावाला सुरुवात होताच या ट्रेसाठी तब्बल साडे नऊ लाखहून अधिक पाऊंड्सची बोली लागली. गुजरात हे मोत्यांची सजावट असलेल्या ट्रेसाठी प्रसिद्ध असून १६ व्या दशकापासून गुजरातमध्ये असे ट्रे तयार केले जातात.