COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 03:23 PM2021-11-08T15:23:51+5:302021-11-08T15:25:33+5:30

हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी विशेष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

maharashtra has been awarded inspiring regional leadership award in cop 26 first state from india | COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

Next

स्कॉटलंड: झपाट्याने वाढत चाललेल्या हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणाऱ्या COP26 या जागतिक व्यासपीठाने महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership या पुरस्काराने गौरवण्यात आले. या परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

खुद्द आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. 

एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान

शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनीच हरित भविष्य पाहण्याची प्रेरणा दिली आहे. माय प्लॅनेट अशी चळवळ आम्ही सुरु केली असून, निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 


 

Web Title: maharashtra has been awarded inspiring regional leadership award in cop 26 first state from india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.