भीषण! मेक्सिकोमध्ये ट्रकचा मोठा अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:21 PM2021-12-10T12:21:45+5:302021-12-10T12:22:58+5:30

Major Accident In Mexico : मेक्सिकोतील चियापास प्रांतातून जाणारा ट्रक वळणावर उलटल्याने हा अपघात झाला.

major accident in mexico truck overturned badly at the turn 49 people died | भीषण! मेक्सिकोमध्ये ट्रकचा मोठा अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

भीषण! मेक्सिकोमध्ये ट्रकचा मोठा अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

Next

मेक्सिकोमध्ये ट्रकचा एक भीषण अपघात झाला आहे. अमेरिकेतील मेक्सिकोच्या चियापास राज्यातील दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहराच्या गुटिएरेझजवळ ट्रक उलटल्याने या अपघात झाला. या अपघातात तब्बल 49 जणांचा मृत्यू झाला असून 58 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मेक्सिकोतील चियापास प्रांतातून जाणारा ट्रक वळणावर उलटल्याने हा अपघात झाला. या ट्रकमध्ये शंभरहून अधिक लोक होते, त्यापैकी बहुतेक मध्य अमेरिकन देशांतील स्थलांतरित होते. बचाव पथकाने ही माहिती दिली आहे. 

स्थानिक प्रशासनाने तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. स्थलांतरित मध्य अमेरिकन देशांच्या गरिबी आणि हिंसाचाराने भरलेल्या वातावरणातून सुटण्यासाठी मेक्सिकोमार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जवळपास 40 जखमी लोकांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मेक्सिकोमधील राज्याची राजधानी चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात अपघात झाला. 

अपघात झालेल्या वाहनातून तब्बल 107 जण प्रवास करत होते. घटनास्थळावरील फोटोंमध्ये फुटपाथवर आणि ट्रकच्या मालवाहू डब्यात मृतदेह पडलेले दिसत होते. पीडित मध्य अमेरिकेतील स्थलांतरित असल्याचे दिसून आले, जरी त्यांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप माहिती समोर आलेली नाही. चियापास राज्य नागरी संरक्षण कार्यालयाचे प्रमुख लुईस मॅन्युएल मोरेनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावलेल्यांपैकी काहींनी सांगितले की ते शेजारच्या ग्वाटेमालाचे आहेत. 

गेल्या काही महिन्यांत, मेक्सिकन अधिकाऱ्यांनी स्थलांतरितांना मोठ्या गटात अमेरिकेच्या सीमेकडे जाण्याची परवानगी दिली आहे. पण गुप्त आणि बेकायदेशीरपणे परप्रांतीय तस्करीचा ओघ सुरूच आहे. ऑक्टोबरमध्ये, उत्तरेकडील सीमावर्ती राज्य तामौलीपासमधील अधिकाऱ्यांना मध्य अमेरिकेतील 652 स्थलांतरित सहा मालवाहतूक ट्रकच्या ताफ्यातून जाताना आढळले होते. गंभीर अपघातांमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांना अनेकदा मेक्सिकोमध्ये किमान तात्पुरते राहण्याची परवानगी दिली जाते कारण ते साक्षीदार आणि गुन्ह्यांचे बळी मानले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: major accident in mexico truck overturned badly at the turn 49 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात